शॉर्टसर्किटमुळे दिड एकरातील केळी व अर्धा एकरातील ऊस जळून खाक

राजकुमार थोरात
शनिवार, 28 एप्रिल 2018

वालचंदनगर : लासुर्णे (ता.इंदापूर) जवळील जाचकवस्ती येथे विजेच्या तारामध्ये शॉर्ट सर्किट  झाल्यामुळे गणेश ठिगळे यांची दीड एकर केळीची बाग व विष्णू टकले यांचा अर्धा एकर उस  जळून खाक झाल्याची घटना घडली. 

लासुर्णे जवळील जाचकवस्ती येथे गणेश ठिगळे याची दीड एकरामध्ये केळीची बाग आहे. केळीच्या बागेमधील विद्युत खांबावरती शुक्रवारी (ता.२७) दुपारी एकच्या सुमारास विजेच्या तारांमध्ये घर्षण झाल्यामुळे शॉर्ट सर्किट झाले. गोळे केळीच्या बागेमध्ये खांब पडल्याने आग लागली.

दुपारची वेळ असल्यामुळे अागीने रौद्र रुप धारण केल्यामुळे केळीची दीड एकर बाग जळून खाक झाली. तसेच बागेमध्ये ठिबक सिंचनाचे पाइप ही जळाले. केळी शेजारी विष्णू टकले यांचा असणारा अर्धा एकराला केळीच्या आगीची धग लागून उसाने ही पेट घेतल्यामुळे उस जळून खाक झाल्याची घटना घडली. जळीत केळीच्या बागेचा व उसाचा तातडीने पंचनामा करुन शेतकऱ्यांनी भरपाई देण्याची मागणी ठिगळे व टकले यांनी केली आहेत.

Web Title: due to short circuit banana and sugarcane farm get fired