सत्तेच्या विकेंद्रीकरणामुळे विकासकामांना गती - सुळे 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

वारजे - सत्तेचे विकेंद्रीकरण होत असल्याने पुणे शहारात चांगली कामे होत आहेत. नगरसेवकांना खासदारांपेक्षा जास्त निधी मिळत असल्याने नगरसेवकांची कामे खासदारांपेक्षा जास्त प्रमाणात होत असतात, हे एक विकेंद्रीकरणाचेच पाऊल आहे, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. 

वारजे येथील मॅटर्निटी हॉस्पिटलच्या इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी सुळे बोलत होत्या. या वेळी नगरसेवक दिलीप बराटे, लक्ष्मी दुधाने, सचिन दोडके, रूपाली चाकणकर, शुक्राचार्य वांजळे, बाबा धुमाळ, हर्षदा वांजळे, दीपाली धुमाळ, दत्ता झंजे, मंगला पोळ, कमलाकर गुंजाळ उपस्थित होते. 

सुळे म्हणाल्या, ""पुणे शहर हे सुसंकृत आहे. लोकसंख्या वाढल्याने शहाराची व्याप्ती वाढली आहे. संपूर्ण देशात पुणे शहाराची शिक्षणाबाबत वेगळीच ओळख आहे.'' 

वारजे भागात मध्यम वर्ग जास्त आहे. त्यांना मोठ्या रुग्णालयात जाणे परवडत नसल्याने महापालिकेच्या वतीने हे रुग्णालय बांधण्यात येणार आहे. यासाठी तीन कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे,'' असे बराटे यांनी सांगितले. 

सूत्रसंचालन वि. दा. पिंगळे यांनी केले. आभार दत्ता झंजे यांनी मानले. या वेळी सुळे यांच्या हस्ते वारजेतील कै. श्‍यामराव श्रीपती बराटे शाळेच्या इमारतीचे उद्‌घाटन व शारदा महिला प्रशिक्षण केंद्राचे उद्‌घाटन करण्यात आले.

Web Title: Due to the speed of development of the decentralization of power