पुण्यात दिवसा चटके; रात्री गारवा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मे 2019

पुणे - ‘फणी’ वादळामुळे राज्याच्या सर्वच भागात तापमानात एका दिवसात जवळपास अर्धा ते एक अंश सेल्सिअसने घट झाली. शुक्रवारी पुण्याचे तापमान ३५ अंश सेल्सिअस एवढे नोंदविले गेले असून, हे तापमान सरासरीपेक्षा २.७ ने कमी आहे. त्यामुळे दिवसा चटके आणि रात्री गारवा अशी स्थिती अनुभवण्यास येत आहे. पुढील तीन दिवस सरासरीपेक्षा तापमान कमी राहणार असल्याने रात्रीच्या उकाड्यापासून पुणेकरांची काही प्रमाणात सुटका झाली आहे.

दक्षिण किनारपट्टीवर आलेल्या ‘फणी’चा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर झाला आहे. राज्यभरातील तापमान कमी झाले आहे. पुणे, कोल्हापूर, सांगली, औरंगाबाद, नाशिक येथील तापमानात मोठी घट झाली आहे. पुण्याचे तापमान एका दिवसात ३५.८ वरून ३५ अंश सेल्सिअस इतके कमी झाले. पुढील तीन दिवसांत पुण्याच्या तापमानात वाढ होऊन, ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत जाणार आहे. तोपर्यंत रात्रीचे वातावरण थंड असणार आहे. 

विदर्भातील ब्रह्मपुरी येथे राज्यात सर्वांत ४५; तर महाबळेश्‍वरमध्ये सर्वांत कमी ३०.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ‘फणी’मुळे गुरुवारपेक्षा शुक्रवारच्या तापमानात घट झाली असली, तरी विदर्भातील बहुतांश भागात ४०च्या पुढे तापमान होते. पुढील दोन दिवसांत विदर्भात पुन्हा उष्णतेची लाट येण्याची शक्‍यता आहे. मराठवाड्यातील काही भागात उष्ण; तर काही भागात सामान्य तापमान होते.

राज्यातील तापमान पुढीलप्रमाणे (अंश सेल्सिअिसमध्ये)
मुंबई ३३.३, सांताक्रूझ ३३, अलिबाग ३५.३, रत्नागिरी ३३.१, पणजी ३३.८, पुणे ३५, जळगाव ४१, कोल्हापूर ३४, महाबळेश्‍वर ३०.१, मालेगाव ४०.६, नाशिक ३४.७, सांगली ३६.८, सातारा ३४.९, सोलापूर ३९.२, अकोला ४२.१, चंद्रपूर ४४, अमरावती ४२, बुलडाणा ३८.५, नागपूर ४३. ६, वर्धा ४३., यवतमाळ ४१.५, गोंदिया ४१.२

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to the storm, the temperature decreased