भरधाव टेम्पो उलटल्याने तीन दुचाकींचे नुकसान 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 डिसेंबर 2018

पुणे : भरधाव वेगातील टेम्पो  चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत उभ्या असलेल्या दुचाकींवर उलटला. या अपघातात जीवितहानी झाली नाही. मात्र, तीन दुचाकींचे मोठे नुकसान झाले. शनिवारी (ता.8) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पुणे-मुंबई महामार्गावर बोरघाटात खंडाळ्यानजीक हा अपघात झाला. 

महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरघाटात रस्त्यालगत दुचाकी उभ्या करून काही तरुण-तरुणी दरीचे विहंगम दृष्य पाहत होते. त्याचवेळी अंडा पॉइंटजवळील तीव्र वळण व उतारावरून भरधाव येणाऱ्या आयशर टेम्पो (एमएच 20 सीटी 3949) चालकाचे नियंत्रण सुटले आणि टेम्पो रस्त्यालगतच्या दुचाकींवर उलटला. त्यात टेम्पो चालकास किरकोळ दुखापत झाली, तर दुचाकींचा चक्काचूर झाला. सुदैवाने दुचाकींजवळ कोणीही नव्हते, त्यामुळे जीवितहानी टळली. आयआरबी कंपनी व महामार्ग पोलिसांनी क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त टेम्पो बाजूला केला. 

Web Title: Due to the Tempo overturn, three bikes were damaged