जलसंधारण कामांमुऴे यंदा टँकरच्या संख्येत घट

संतोष आटोळे
सोमवार, 11 जून 2018

शिर्सुफळ - बारामती तालुक्यामध्ये करण्यात आलेल्या जलसंधारण कामांमुळे यंदा उन्हाळ्यात टँकरच्या संख्येत घट झाली आहे. यामुळे आगामी काळातही उरलेल्या जलसंधारण कामांसाठी पुढाकार घेवु व तालुका टॅकरमुक्ती साठी प्रयत्न करु अशी ग्वाही पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी दिली.  

गाडीखेल (ता.बारामती) येथे टंचाई निवारण योजनेतून करण्यात येणाऱ्या नळपाणी पुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बारामती पंचायत समितीचे सभापती संजय भोसले, उपसभापती शारदा खराडे, पंचायत समिती सदस्य लिलाबाई गावडे, सरपंच बाळासाहेब आटोळे, उपसरपंच नानासाहेब जगताप, ग्रामपंचायत सदस्य शरद शेंडे, माजी सरपंच अनिल आटोळे, सतिश गोलांडे, जानदेव जगताप, दादा आटोळे, विश्वास आवदे, दत्तु गाढवे, बापु धायतोंडे, ग्रामसेवका अरुण जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलताना पवार पुढे म्हणाले, तालुक्यामध्ये सकाळ रिलीफ फंड, अॅग्रीकल्चरव डेव्हल्पमेंट ट्रस्ट, बारामती अॅग्रो, मगरपट्टा सिटी, भारत फोर्ज, पियाजीओ यांच्या सह शासनाच्या विविध विभागाच्या माध्यमातुन ओढा खोलीकरण, सिमेंट बंधारे, सीसीटी, माती बांध यासारखी जलसंधारणांची कामे मोठ्या प्रमाणावर झाली. यांमुळे भूजल पातळीमध्ये वाढ व उन्हाळ्यात भेडसावणारी पाणी टंचाईची समस्या कायमची दुरु होईल याचा प्रत्यय यंदाच्या उन्हाळ्यात आला आहे. यामुळे उर्वरित भागातही आगामी काळात जरसंधारणाची कामे हाती घेण्यात येणार आहेत.

Web Title: Due to water conservation works, the number of tankers decreased this year