इंदापूर तालुक्यातील तरूणाच्या पुढाकारामुळेच गावे झाली पाणीदार : दत्तात्रय भरणे 

bharne
bharne

वडापुरी :  इंदापूर तालुक्यांतील ३७ गावांनी वाॅटर कप स्पर्धेत सहभाग घेतला परंतु खऱ्या अर्थाने गावातील युवकांनी व विद्यार्थ्यांनी केलेली मेहनत व केलेले श्रमदान तसेच तरूणांच्या पुढाकारामुळेच गावे पाणीदार झाली असल्याची माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर येथे दिली . 

सत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धा २०१८ "गौरव जलरत्नांचा सन्मान महाराष्ट्राचा" या कार्यक्रमात लोकनेते शंकरराव पाटील सभागृह इंदापूर येथे दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार दत्तात्रय भरणे होते. यावेळी तहसिलदार श्रीकांत पाटील, तालुका कृषी अधिकारी सुर्यभान जाधव, कोरेगाव तालुक्यांतील आदर्श सरपंच मनोज अनपट,पाणी फाॅडेशनचे डाॅ.अविनाश पोळ, आण्णासो डालपे,शेखर पाटील,बिल्ड ग्राॅफिक चे बाळासाहेब सोनवणे,

राज कुमार यांच्यासह अधिकारी व तालुक्यांतील सरपंच,सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते यावेळी पत्रकार,भूमिपुत्र तसेच गावातील महिला यांचा सन्मान करण्यात आला. 

 आमदार दत्तात्रय भरणे पुढे म्हणाले की, ज्या माणसांची गरज आहे ती माणसं आजच्या सन्मान सोहळयांत पाहिला मिळाली, लोकांनी गावासाठी आपल्या मातीसाठी काम केले पाहिजे.शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेतून निधी तालुक्यांतील गागागावात आला,परंतु आपल्या हाताने केलेले श्रम हे मनाला सुखद आनंद देते, असे आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले. 

 यावेळी तहसिलदार श्रीकांत पाटील म्हणाले की,३७ गावांनी वाॅटर कप स्पर्धेत सहभाग नोंदविला होता, परंतु विस ते बाविस गावातून यासाठी योग्य प्रतिसाद मिळाला,या स्पर्धेच्या माध्यमातून जी चळवळ सुरू झाली त्यामुळे खुप जनतेला शिकता आले, दोन राजकीय पक्षामुळे रात्रन दिवस काम झाले, त्यामुळे खरी गमंत आली,  लामजेवाडी , घोरपडवाडी, व काटीने चांगले काम केले,पाणी फाॅडेशन मुळे ग्रामीण भागात पाण्याचे महत्व कळले, मात्र यामधून चांगले गाव घडले असे तहसिलदार श्रीकांत पाटील म्हणाले. 

 "पत्रकारांचा व योगदान देणाऱ्या संस्थाचा  विषेश सन्मान " सत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धांचे वार्तांकन उकृष्ट केल्याने पत्रकार निलकंठ मोहिते, आदम पठाण, नानासाहेब चांदणे, संदिप सुतार, भिमराव आरडे व तसेच योगदान देणाऱ्या विविध संस्था, दैनिक सकाळ, जैन संघटना ,बारामती संस्था इत्यादींचा यांचा विषेश सन्मान आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आला. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com