तोतया आयपीएस अधिकाऱ्यांची टोळी जेरबंद 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

पुणे - पोलिस उपायुक्‍त असल्याचे भासवून नागरिकांना लुबाडणाऱ्या टोळीतील तोतया आयपीएस अधिकाऱ्यासह सहा जणांना गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने अटक केली. मोटारींवर "भारत सरकार' लिहून आणि सफारी ड्रेस परिधान करून पोलिस अधिकारी असल्याचे सांगून नागरिकांकडून पैसे उकळत असल्याचे समोर आले आहे. 

सोहेब महंमद शेख (वय 22, रा. जनता वसाहत, पर्वती), आकाश नवनाथ जठार (वय 30, रा. अंबिकानगर, बिबवेवाडी), शंकर गुलाब मुजमुले (वय 29, रा. नऱ्हेगाव, मानाजीनगर), गणेश दत्तात्रेय मुजमुले (वय 27), विकास विलास गव्हाणे (वय 23) आणि रवींद्र सोनबा खाटपे (वय 22, तिघे रा. कोंढणपूर, ता. हवेली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज-सिंहगड परिसरात एक व्यक्‍ती विशेष शाखेत पोलिस उपायुक्‍त असल्याचे सांगत आहे. तो आणि त्याचे सहकारी "भारत सरकार' असे लिहिलेल्या मोटारीत बसून लोकांकडून पैसे उकळत आहेत. ते सर्वजण नवले पुलाजवळ एकत्रित येऊन बाहेरगावी जाण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती प्रॉपर्टी सेलचे पोलिस हवालदार संजय जगताप यांना मिळाली. त्यावरून अतिरिक्‍त आयुक्‍त दीपक साकोरे आणि गुन्हे शाखेचे सहायक आयुक्‍त सुरेश भोसले यांच्या सूचनेनुसार प्रॉपर्टी सेलच्या पथकाने आरोपींना अटक केली. 

चौकशीदरम्यान विशेष अधिकारी असल्याचे भासविण्यासाठी आरोपींनी सफारी ड्रेस परिधान केले होते. पोलिस उपायुक्‍त असल्याचे सांगणारा त्यांचा साथीदार भास्कर विजय शिर्के याला पोलिसांनी पकडले. त्यामुळे सर्वजण पळून बाहेरगावी जाण्याच्या तयारीत असल्याची कबुली आरोपींनी पोलिसांसमोर दिली आहे.

Web Title: Dummy gang IPS officers bound