‘डमी आमदार’प्रकरणी गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

शिक्रापूर - विधानसभा सदस्याचे स्टिकर लावून फिरणाऱ्या सणसवाडी (ता. शिरूर) येथील गोरक्ष भुजबळ यांच्यावर शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ज्या आमदारांनी त्यांना स्टिकर दिले, त्या आमदारांनी कुणाला स्टिकर वाटले, याचीही माहिती घेतली जात आहे. विधानसभा सदस्याचे बेकायदा स्टिकर लावल्याप्रकरणी पुणे जिल्ह्यातील हा पहिलाच गुन्हा आहे. 

शिरूर तालुक्‍यात अशा पद्धतीने एक गाडी (एमएच ११, एमएफ ००४७) फिरत असल्याचे शिक्रापुरात निदर्शनास आले. नवे पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी बेकायदा स्टिकर लावून फिरणारे सणसवाडीच्या माजी सरपंच गीता भुजबळ यांचे पती गोरक्ष भुजबळ यांच्यावर भारत सरकारचे राज्यचिन्ह (अयोग्य वापरास प्रबंध कायदा २००५ कलम ४ व ७) प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. गरजेनुसार भुजबळ यांच्यावर अटकेची कारवाई केली जाणार असल्याचे गिरीगोसावी यांनी सांगिते. 

Web Title: Dummy MLA case