दापोडीत तुटलेले उघडे चेंबर, बंद पथदिवे रहदारीस धोकादायक

रमेश मोरे
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

रेल्वे प्रशासनाच्या सिमाभिंतीला लागुन असलेल्या या रस्त्यावर रात्री चाकरमानी मंडळींची मोठ्या प्रमाणावर ये जा असते. बंद असलेल्या पथदिव्यांमुळे महिलांना अंधारातून ये जा करावी लागत आहे. स्थानिक नागरीकांनी अनेकदा पालिका प्रशासनाकडे याबाबत तोंडी तक्रारी केल्या आहेत.

जुनी सांगवी - दापोडी येथील गणेशनगर भागातील रेल्वेसिमाभिंतीजवळील रस्त्यावरील ड्रेनेज लाईनचे चेंबर झाकणाविना उघडे आहेत. तर काही चेंबरची झाकणे तुटल्याने हा रस्ता रहदारीसाठी नागरीकांना धोकादायक ठरत आहे. यातच येथील काही ठिकाणचे पथदिवे बंद असल्याने रात्री नागरीकांना अंधाराबरोबरच येथील उघड्या चेंबरचा सामना करत धोकादायकरित्या मार्गक्रमण करावे लागत आहे.

रेल्वे प्रशासनाच्या सिमाभिंतीला लागुन असलेल्या या रस्त्यावर रात्री चाकरमानी मंडळींची मोठ्या प्रमाणावर ये जा असते. बंद असलेल्या पथदिव्यांमुळे महिलांना अंधारातून ये जा करावी लागत आहे. स्थानिक नागरीकांनी अनेकदा पालिका प्रशासनाकडे याबाबत तोंडी तक्रारी केल्या आहेत. मात्र येथील दुरूस्त्या पालिका प्रशासनाने करायच्या की रेल्वे प्रशासनाने याबाबत एकमत नसल्याने गेली दोन महिन्यांपासुन येथील रहिवासी नागरीकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. अंधाराचा फायदा घेत या परिसरात चोऱ्यांच्या प्रमाणातही वाढ झाल्याचे नागरीकांनी सांगितले.

रहदारीसाठी धोकादायक चेंबर बरोबरच नागरीकांना उघड्या चेंबरमुळे दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. उघड्या चेंबरमुळे कचरा, गाळ जावुन चेंबर तुंबण्याचे प्रकारही घडत आहेत. रेल्वे प्रशासन व पालिका प्रशासनाने समन्वय साधुन येथील उघडे असलेले चेंबर, तुटलेले चेंबर व पथदिव्यांची दुरूस्ती करावी अशी रहिवाशी नागरीकांमधुन मागणी होत आहे.

उघडे तुटलेले चेंबरमुळे रात्री नजरेस न आल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथील दुरूस्ती करण्यात यावी. - अनिल कुलकर्णी, रहिवासी नागरीक

येथील काही ठिकाणचे पथदिवे बंद असल्याने रात्री ये जा करण्यासाठी त्रासाचे ठरत आहे.अंधारामुळे चोऱ्यांच्या प्रमाणातही या भागात वाढ झाली आहे. - प्रमोद गायकवाड, रहिवासी नागरीक

येथील रस्त्याचे काम प्रस्तावित आहे. येत्या दोन तीन दिवसात येथील चेंबर दुरूस्ती व पथदिव्यांचे काम करण्यात येईल. - सुनिल दांगडे, कनिष्ठ अभियंता स्थापत्य विभाग दापोडी
 

Web Title: Duplicate broken open chamber closed streetlights dangerous to traffic