बनावट लेबल लावून मुदतबाह्य कीटकनाशकांच्या विक्रीविरोधात गुन्हा दाखल

जनार्दन दांडगे
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

लोणी काळभोर (पुणे) : कीटकांची विनापरवाना वाहतूक व साठवण तसेच बनावट लेबल लावून मुदतबाह्य कीटकनाशकांची विक्री केल्यावरून कीटकनाशक उत्पादन करणारी रामश्री केमिकल्स कंपनी व कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील कीटकनाशक विक्रेता दत्तात्रेय जवळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार प्रभारी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सत्यजित शितोळे (वय - ३०, रा. रुद्र सोसायटी, केसनंद ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलिसांत दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रेय जवळकर यांचे म्हातोबा जोगेश्वरी नावाने  कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे शेती भंडार व कीटकनाशक विक्रीचे दुकान आहे. तसेच रामश्री केमिकल्स व झुवारी अॅग्रो केमिकल्स कंपनीकडून त्यांच्या द्कानाम्ध्ये माल येतो. दरम्यान १९ मार्च २०१८ रोजी दुपारी सत्यजित शितोळे यांच्या समवेत गुणनियंत्रक तज्ञ व हवेली पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांनी म्हातोबा जोगेश्वरी शेती भंडार या दुकानाची व गोडाऊनची तपासणी केली. यामध्ये रामश्री केमिकल्स कंपनीचे ६ ड्रम (१ हजार २०० लीटर) भरून अॅमिनी सॉफ्ट, २ हजार लीटर ग्लायफोसेट व झुवारी अॅग्रो केमिकल्स कंपनीचे ४० लीटर कीटकनाशक आढळून आले होते. सदरच्या दुकानाच्या परवान्यामध्ये औषध वाहतूक किंवा साठवणीचा परवाना नसल्याचे आढळून आले. 

दरम्यान रामश्री केमिकल्स कंपनीला महाराष्ट्र राज्यात कीटकनाशक विक्रीचा देखील परवाना नसल्याचे तपासात निष्पन्न झाले. तसेच म्हातोबा जोगेश्वरी दुकानच्या गोडावूनमधील  औषधांची पाहणी केली असता, त्यामध्ये मुदत संपलेली व २० बाटल्यांवरील लेबल फाडल्याचे लक्षात तपासणी पथकाच्या लक्षात आले. तसेच बाटल्यांना रीलेबलिंग व रीपॅकिंग साठी लागणारे लेबल छपाई मशीन, पॅकिंगसाठी बॉक्स व थिनर आढळून आले. दरम्यान गोडावून मध्ये अढळून आलेल्या किटकनाशकांच्या तपासणी अहवालानंतर दुकानचालक दत्तात्रेय जवळकर व रामश्री केमिकल्स कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: duplicate label expired fertilizers sale fri submitted