बारामतीत दुर्गा मुव्ही क्लबचा प्रारंभ; बकेट लिस्टचा आनंद महिलांनी लुटला. 

मिलिंद संगई 
गुरुवार, 31 मे 2018

बारामती : महिलांना उत्तम चित्रपट व लघुपट एकत्रित पाहता यावेत या उद्देशाने बारामतीत दुर्गा मुव्ही क्लबचा प्रारंभ काल (ता. 30) झाला. माधुरी दीक्षित यांच्या नव्यानेच आलेल्या बकेट लिस्टचा आनंद बारामतीतील महिलांनी लुटला. 

महिलांना दररोजच्या व्यापातून काही काळ विरंगुळा मिळावा व त्यांचे निखळ मनोरंजन व्हावे या उद्देशाने येथील भगिनी मंडळाच्यावतीने दुर्गा मुव्ही क्लबचा औपचारिक प्रारंभ झाला. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार, माजी सनदी अधिकारी प्रभाकर करंदीकर, सिटी प्राईडचे प्रकाश चाफळकर आदी या प्रसंगी उपस्थित होते. 

पुरस्कार प्राप्त तसेच वेगळे विषय हाताळणारे चित्रपट अल्प दरात महिलांना दाखविण्याचा या मागचा उद्देश असल्याची माहिती प्रास्ताविकात भगिनी मंडळाच्या अध्यक्षा सुनीता शहा यांनी दिली. कै.म.स. करंदीकर यांच्या 25 व्या पुण्यतिथी वर्षानिमित्त वर्षभर महिलांना अल्प दरात चित्रपट दाखविण्याची संकल्पना रेखा करंदीकर व सुनीता शहा यांनी प्रत्यक्षात उतरविली. पहिल्याच चित्रपटाला महिलांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा उपक्रम वर्षभर राबविणार असल्याचे सुनीता शहा यांनी सांगितले. 

Web Title: durga movie club launches in baramati; Bucket list was enjoyed by women.