लॉकडाऊनकाळात पुणेकरांनी मारला मॅगीवर ताव!

During the lockdown Pune buy maggi most says Dunzo App Report
During the lockdown Pune buy maggi most says Dunzo App Report

पुणे :  2020 मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिक खूप जास्त वेळ घरातच घालवत होते. त्यामुळे घरबसल्या ऑनलाईन खरेदी करण्याकडे त्यांचा कल जास्त होता. DUNZO या शॉपिंग अॅपच्या रिपोर्टनुसार, अॅप वापरण्याऱ्यांनी भूक शांत करण्यासाठी देखील DUNZO चा वापर केला आहे. मॅगी ऑर्डर करण्यामध्ये पुणेकरांनी मुंबईकरांना मागे टाकत बाजी मारली आहे तर दिल्ली, चेन्नई आणि  मुंबईच्या नागरिकांनी मात्र चहापेक्षा कॉफी ऑर्डर करण्याला पसंती दिली आहे. बंगळुरुच्या नागरिकांनी सर्वात जास्त बिर्याणी ऑर्डर केली आहे  तर मुंबईच्या नागरिकांनी डाल खिचडी. त्याचबरोबर चेन्नईमध्ये सर्वात जास्त इडली ऑर्डर करण्यात आली. गुरुग्रामच्या नागरिकांनी खूप साऱ्या पोटॅटो टिक्की बर्गर आर्डर केल्या आहेत. 

कोरोनाच्या साथीनंतर नागरिकांमध्ये आरोग्यादायी पर्याय निवडण्याला जास्त पसंती देत असल्याचे समोर येत आहे. हैद्राबाद, चेन्नई, बंगळुरूमधील नागरकिांनी साखरेपेक्षा जास्त गुळ खरेदी  केली आहे. तसेच नागरिकांनी त्यांच्या पाळीव प्राण्याची गरजा भागविण्यासाठी देखील या अॅपचा वापर केल्याचे दिसत असून गुरुग्रामने यात बाजी मारली आहे. बंगळुरु, पुणे, चेन्नई आणि हैद्राबादमधून कॅट फुड  मांजरीसाठीचे खाद्यपदार्थ) जास्त ऑर्डर करण्यास पसंती दिली आहे. यंदा लोकांची वाचनाची सवय देखील वाढल्याचे समोर आले आहे. 

लॉकडाऊनच्या काळात भारतातील नागरिकांनी रात्री पेक्षा दिवसा कॉन्डम्सची खरेदी केली असल्याचे समोर आले आहे. या अॅपवरुन दिवसापेक्षा रात्री तिप्पट शॉपिंग केली जात असल्याचेही समोर आले आहे. रात्री पेक्षा दिवसा कॉन्डम्स खरेदी करण्यामध्ये फक्त हैद्राबादमध्ये 6 पटीने वाढ झाल्याचे दिसते तर चेन्नईमध्ये 5 पटीने आणि जयपूर मध्ये 4 पटीने खरेदीमध्ये वाढ झाली आहे. दिल्ली आणि मुंबईमध्येही 3 पट जास्त आकडेवारी नोंदविली गेली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, बंगळुरुच्या नागरिकांनी शेजारील चेन्नईकडून 22 पट जास्त रोलिंग पेपर खरेदी केल्याचे समोर आले आहे. रोलिंग पेपर खासकरून सिगारेट बनविण्यासाठी वापरला जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com