४२ किलोच्या खंडा तलवारीचे मर्दानी खेळ; १८ तास चालला दसरा सोहळा (व्हिडिओ)

मंगेश कचरे
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

- ४२ किलोच्या खंडा तलवारीचे मर्दानी खेळ.
- खंडेरायाच्या मर्दानी दसरा सोहळ्याची सांगता.
- १८ तास चालला दसरा सोहळा 

जेजुरी (पुणे) : अख्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या  खंडोबाच्या जेजुरी नगरीत दरवर्षी पारंपारिक पद्धतीने मर्दानी दसऱ्याचे आयोजन करण्यात येते. तब्बल १८ तासापेक्षाही जास्त काळ हा सोहळा गडावर संपन्न झाला. काल सायंकाळी 6 वाजता खंडेरायाची पालखी सीमोल्लंघनाला गेल्यानंतर हा मर्दानी खेळ सुरु झाला.

जय मल्हार... जयघोषात आणि भंडार्‍याच्या मुक्त उधळणीने गडाला पिवळेपण आले होते. जेजुरी गडावर उत्साह आणि आनंदाचे वातावरण होते. अवघ्या महाराष्ट्राला प्रेरणा देणार्‍या खंडेरायाच्या जेजुरीचे, उभ्या महाराष्ट्रत जेजुरीच्या खंडेरायाच्या दसरा सोहळ्याला मर्दानी दसरा म्हणून ओंळखले जाते, खंडेरायाचा दसरा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक जेजुरीत आधीच दाखल झाले होते, जेजुरीकर सुद्धा वर्षभर कुठेही असले तरी दसऱ्यानिमित्त गडावर येऊन सोहळ्यात सहभागी होत असतात.

काल (ता.09) दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी 6च्या सुमारास खंडेरायाचा पालखी सोहळ्याला सुरवात झाली. पालखी सोहळा रमण्यात जाण्याअगोदर दुपारपासूनच खांदेकरी, मानकरी तसेच भाविकांनी मोठ्या प्रमाणवर गर्दी केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dussehra festival at Jejuri fort