पुण्यातील हवेची गुणवत्ता ढासळली; समाधानकारक श्रेणीतून खराब श्रेणीत

पुणे आणि मुंबईची हवा ही दिल्ली आणि अहमदाबाद या दोन्ही शहरांपेक्षा खराब असल्याचे नोंदण्यात आले.
dust storm
dust stormSakal

पुणे : पुण्यातील हवेची गुणवत्ता समाधानकारक श्रेणीतून ढासळून अत्यंत खराब श्रेणीत पोचली आहे. शहरातील अनेक ठिकाणी अतिसूक्ष्म धुलीकण (पीएम २.५) आणि सूक्ष्म धुलीकणाच्या प्रमाणात वाढ झाली असून हवेची गुणवत्ता सोमवारी दुपारी ३७४ प्रति घनमीटर इतकी नोंदली गेली. तर पुढील दोन दिवस पुण्याच्या हवेची गुणवत्ता खराब श्रेणीतच राहणार असल्याचे भारतीय उष्णकटीबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या (आयआयटीएम) ‘सफर’ या संकेतस्थळावरील नोंदीतून स्पष्ट झाले आहे. (Dust Storm Effect in Pune Updates)

आखाती देशातून पाकिस्तानकडून निघालेले धुळीचे वादळ गुजरात, अरबी समुद्राच्या मार्गे रविवारी (ता. २३) महाराष्ट्रात पोचले होते. या वादळामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात दिवसभर धुके पसरले होते. पुण्यात ही काल (रविवारी) अनेक ठिकाणी धुळीच्या वादळामुळे दृष्यमानता कमी झाली होती. परिणामी शहरात पीएम २.५ आणि पीएम १० चे प्रमाण वाढले होते. ‘सफर’च्या माध्यमातून पुणे, दिल्ली, मुंबई आणि अहमदाबाद या चार शहरांतील हवेच्या गुणवत्तेची नोंदणी दररोज केली जाते. त्यानुसार पुणे आणि मुंबईची हवा ही दिल्ली आणि अहमदाबाद या दोन्ही शहरांपेक्षा खराब असल्याचे नोंदण्यात आले.

dust storm
कोरोनाकाळात विद्यार्थांवर मानसिक परिणाम; सरकारकडून होणार सर्वेक्षण

सध्या रस्त्यांवर वाहनांची वर्दळ सुरू असली तरी पुण्यातील हवेची गुणवत्ता ही चांगली, समाधानकारक व मध्यम या श्रेणीत नोंदली जात होती. परंतु सोमवारी एकाकी हवेचा दर्जा अत्यंत खराब श्रेणीवर आला. पुण्यात रात्री ३५७ प्रति घनमीटर इतक्या सूक्ष्म धुलीकणाची तर, २१४ प्रति घनमीटर अतिसूक्ष्म धुलीकणाची नोंद झाली. त्याचबरोबर सर्वाधिक पीएम २.५ ची नोंद पाषाण, शिवाजीनगर आणि हडपसर येथे नोंदविण्यात आली. सध्या पुण्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून हवेची गुणवत्ता ढासळल्याने याचा परिणाम आरेग्यावरी ही होऊ शकतो. श्र्व‍सनाचा आजार असलेल्या नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला देखील तज्ञांनी दिला.

‘‘आरोग्यावर सर्वाधिक परिणाम पीएम २.५ मुळे होतो. सध्या पुण्यातील विविध ठिकाणी या धुलीकणाचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. हे धुलीकण फुफ्फुसांमध्ये प्रवेश करतात आणि याचा शरीरावर घातक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी मास्क वापरणे हाच एक उत्तम पर्याय आहे. यामुळे कोरोनाबरोबर या धुलीकणाला शरीरात प्रवेश करण्यापासून थांबविणे शक्य होईल.’’

- डॉ. संदीप साळवी, छातीरोगतज्ज्ञ

पुण्यातील पीएम २.५ ची नोंद ( प्रमाण प्रति घनमीटरमध्ये)

पाषाण ः ४२५

शिवाजीनगर ः ४१७

हडपसर ः ४०१

भूमकर चौक ः ३९९

कोथरूड ः ३९८

आळंदी ः ३८७

निगडी ः ३८३

कात्रज ः ३७४

लोहगाव ः ३६७

भोसरी ः ३२६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com