बारामतीत डायनामिक्सने दिले प्रत्येकाला 23 हजारांचे अतिरिक्त अनुदान

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 April 2020

कोरोनाच्या संकटामुळे एकीकडे अनेक कंपन्या वेतनकपातीसह इतर उपाययोजना असताना दुसरीकडे काही कंपन्यांनी मात्र आपल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची अधिक काळजी घेतल्याचे दिसत आहे.

बारामती : कोरोनाच्या संकटामुळे एकीकडे अनेक कंपन्या वेतनकपातीसह इतर उपाययोजना असताना दुसरीकडे काही कंपन्यांनी मात्र आपल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची अधिक काळजी घेतल्याचे दिसत आहे.

बारामतीच्या श्रायबर डायनामिक्स डेअरी या कंपनीने कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर आपल्या देशभरातील चार प्रकल्पांवरील एक हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांना मार्च महिन्याच्या पगाराव्यतिरिक्त प्रत्येकी 23 हजार रुपयांचे अतिरिक्त अनुदा दिले जाणार आहे. बारामतीचे प्रकल्प प्रमुख जितेंद्र जाधव यांनी ही माहिती दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक कुटुंबातच एक भीतीचे वातावरण तयार झाले आहे, डायनामिक्स डेअरीमध्ये दुधावर प्रक्रिया करुन पूरक उत्पादने तयार केली जातात. पाच जिल्ह्यातून जवळपास दहा लाख लिटर दूध संकलनाची क्षमता असलेला हा प्रकल्प आहे. या अडचणीच्या काळातही डायनामिक्सने आपला प्रकल्प सुरु ठेवून दूध स्विकारणे सुरुच ठेवले आहे. या काळात कर्मचारी व अधिकारी यांचे मनोधैर्य उंचवावे व त्यांना अतिरिक्त अनुदानाच्या माध्यमातून सहकार्य व्हावे या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे जाधव यांनी सांगितले.

एकीकडे वेतन कपात करणा-या विविध कंपन्यांपुढे बारामतीच्या श्रायबर डायनामिक्सने वेगळा आदर्शच घालून दिला आहे. यात अगदी  तळातील कर्मचा-यापासून ते व्यवस्थापकीय संचालकांपर्यत प्रत्येकाला समान म्हणजे 23 हजारांचेच अतिरिक्त अनुदान देण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: DynamiX gives Additional Subsidy of Rs 23 THousand