ग्रामीण भागातही ई-बीट पेट्रोलिंग

ग्रामीण भागातही ई-बीट पेट्रोलिंग

वडगाव निंबाळकर -  शहराप्रमाणे ग्रामीण पोलिस ठाण्याअंतर्गत भागातही ई-बीट पेट्रोलिंगचा अवलंब करण्याचा निर्णय ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाने घेतला आहे.

सरकारचा प्रत्येक विभाग आता तंत्रज्ञानाचा वापर करून प्रभावी काम करू लागला आहे. यात पोलिससुद्धा कमी नाहीत. शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील पोलिस ठाणी पेपरलेस झाली आहेत. कामे ऑनलाइन पद्धतीने होत आहेत. रात्रीच्या वेळी गस्त घालणाऱ्या पेट्रोलिंग गाडीवर नियंत्रण असावे, पोलिस ठाणे पातळीवर सुरू असलेले पेट्रोलिंग अधिक प्रभावी व्हावे, हद्दीतील महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांचा वावर झाला पाहिजे, पोलिस आणि जनता यांच्यातील संबंध वाढावेत यासाठी आता आरएफडी प्रणाली अंतर्भूत असणारी ई-बीट पेट्रोलिंग सुरू केली जात आहे. यासाठी आवश्‍यक ती सर्व यंत्रणा पोलिस ठाण्यांमध्ये पोच झाली. याच्या वापराबाबत पोलिसांना योग्य ते प्रशिक्षण देण्यात आले आहे.

बारामती, इंदापूर, दौंड, लोणावळा, शिरूर, खेड या पोलिस ठाण्यांमध्ये ई-बीट पेट्रोलिंग यशस्वी झाल्यावर आता ग्रामीण हद्दीतील २५ ठाणी निवडली आहेत. शहरी भागात सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम असल्याने चोरीच्या घटना कमी होऊ लागल्या आहेत. याप्रमाणे आता ग्रामीण भागातसुद्धा फरक पडेल.  - जयंत मीना, अतिरिक्त पोलिस अधीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com