प्रवाशांच्या हस्ते आज बसचे लोकार्पण

E-Bus
E-Bus

पुणे  - पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांना सुविधा देण्यासाठी पीएमपीच्या १०७ नव्या बस स्वातंत्र्य दिनापासून (१५ ऑगस्ट) मार्गांवर धावणार आहेत. त्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच वेळी बसच्या लोकार्पणाचे कार्यक्रम होणार आहेत. ज्येष्ठ नागरिक, महिला प्रवाशांच्या हस्ते या नव्या बसचे उद्‌घाटन होईल, अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी आज दिली.

स्वातंत्र्यदिनी पुणे महापालिका बस स्थानकावर सीएनजीवरील १५४ पैकी ५७ बसचे प्रवाशांच्या हस्ते उद्‌घाटन होणार आहे. १२५ ई-बसपैकी ५० ई-बसचे लोकार्पण पिंपरी-चिंचवडमध्ये डॉ. आंबेडकर चौकात होणार आहे. हे दोन्ही कार्यक्रम सकाळी साडेनऊ वाजता होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com