पुणे जिल्हा न्यायालयात सुरू होणार ई - पेमेंटची सुविधा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

पुणेे : पुणे जिल्हा न्यायालयात सुरू होणार ई - पेमेंटची सुविधा सुरु करण्यात येणार आहे.  ई - पेंमेंटची सुविधा सुरू करणारे पुणे जिल्हा न्यायालय देशातील पहिलेच न्यायालय ठरणार आहे.

पुणेे : पुणे जिल्हा न्यायालयात सुरू होणार ई - पेमेंटची सुविधा सुरु करण्यात येणार आहे.  ई - पेंमेंटची सुविधा सुरू करणारे पुणे जिल्हा न्यायालय देशातील पहिलेच न्यायालय ठरणार आहे.  ही सुविधा 15 डिसेंबरपासून सुरू होणार असून यापुढे पक्षकार कोर्ट फी, दंडाची रक्कम, न्यायालयीन कागदपत्रांच्या नक्कल प्रतींसाठीचे पैसे, न्यायालयाच्या आदेशानुसार पोटगीची रक्कम आदी. सर्व प्रकारचे व्यवहार ई - पेमेंटद्वारे करू शकणार आहेत. यापैकी 2000 रुपयांपर्यंतची कोणतीही रक्कम ई - पेमेंटद्वारे भरण्यासाठी कोणताही सर्व्हिस चार्ज लागणार नाही.

''पक्षकार आपल्या घरी बसून वा अन्यत्र कुठुनही हे पैसे ऑनलाईन भरू शकणार आहेत. कोर्टात यापुढे कॅश काउंटरवर रांगेत उभं राहण्याची आवश्यकता नसून कोर्टातूनच ई - पेमेंट करायचे असल्यास त्यासाठी आवश्यक वेबसाईट व संगणक, इंटरनेट इ. सोयी न्यायालय प्रशासन उपलब्ध करून देणार आहे.'' , अशी माहिती जिल्हा न्यायालय प्रशासनाने आज पत्रकार परिषदेत दिली माहिती.

Web Title: E-payment facility will be started in Pune District Court