ई-टॉयलेट खरेदी प्रस्तावाचे गौडबंगाल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

पुणे - केंद्र सरकारकडून मंजूर केलेल्या प्रत्येकी साडेतीन लाख रुपयांच्या ई-टॉयलेट खरेदीचा प्रस्ताव असताना प्रत्येकी साडेअकरा लाख रुपये किमतीचे ई-टॉयलेट खरेदीचा प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समितीसमोर मांडण्यात आला. त्यामुळे या प्रकरणातील गौडबंगाल वाढत आहे.

‘सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी पार्क’ या संस्थेने शिफारस केलेल्या कंपनीकडून प्रायोगिक तत्त्वावर नऊ लाख रुपये खर्च करून शहरात तीन ठिकाणी ई-टॉयलेट बसविण्याचा प्रस्ताव यापूर्वी आला होता. ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सर्व प्रक्रिया पूर्ण होऊनही हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी आलाच नाही.

दोन कोटी रुपये खर्च करून शहरात १४ ठिकाणी ई-टॉयलेट बसविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर प्रशासनाने मंजुरीसाठी ठेवला आहे. प्रत्येकी साडेअकरा लाख रुपये किमतीची हे टॉयलेट एका कंपनीकडून खरेदी करण्यास मंजुरी देण्याची शिफारस या प्रस्तावात करण्यात आली आहे. या संदर्भात ‘सकाळ’ने वृत्त दिल्यानंतर स्थायी समितीने हा प्रस्ताव एक आठवडा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. उद्या (मंगळवारी) होणाऱ्या समितीपुढे हा प्रस्ताव पुन्हा चर्चेसाठी येणार आहे. 

‘त्या’ प्रस्तावाचे काय झाले?
सारसबाग, स. प. महाविद्यालय चौक व दांडेकर पूल या ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर ई-टॉयलेट बसविण्याचा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वीच प्रशासनाकडे आला होता. प्रस्ताव तयार करून स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी पाठविण्याच्या प्रतीक्षेत असतानाच प्रशासनाकडून ऐन वेळी बेत बदलण्यात आला. त्या प्रस्तावाचे पुढे काय झाले, हे अद्याप गुलदस्तातच आहे.

Web Title: e-toilet purchasing proposal issue