पिंपळे सौदागरमध्ये महिलांसाठी इ-टॉयलेट

मिलिंद संधान
रविवार, 17 जून 2018

सार्वजनिक स्वच्छता गृहांच्या अभावी महिलांची होत असलेली कुंचबना पाहता पिंपरी चिंचवड महानगरपालिका व सँमटेक क्लिन अँण्ड क्लिअर सिस्टिमच्या वतीने पिंपळे सौदागर येथे लवकरच इ-टॉयलेट ही संकल्पना प्रत्यक्षात येत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरचे लिनियर गार्डनचे काम पुर्णत्वाला येत असताना येथे आधुनिक तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक यंत्रणेने जोडलेले स्वच्छता गृह येत्या आठवडाभरात बसविले जाणार आहे.  

नवी सांगवी (पुणे) - सार्वजनिक स्वच्छता गृहांच्या अभावी महिलांची होत असलेली कुंचबना पाहता पिंपरी चिंचवड महानगरपालिका व सँमटेक क्लिन अँण्ड क्लिअर सिस्टिमच्या वतीने पिंपळे सौदागर येथे लवकरच इ-टॉयलेट ही संकल्पना प्रत्यक्षात येत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरचे लिनियर गार्डनचे काम पुर्णत्वाला येत असताना येथे आधुनिक तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक यंत्रणेने जोडलेले स्वच्छता गृह येत्या आठवडाभरात बसविले जाणार आहे.  

कंपनीच्या वतीने प्रायोगिक तत्वावर दिलेले हे महिलांकरीताचे स्वच्छता गृह कोकणे चौकात सर्वप्रथम बसविले जाणार आहे. पाच रूपयांचे नाने येथील मशिन मध्ये टाकल्यानंतर याचा वापर करता येणार आहे. पिंपळे सौदागर येथील उच्च शिक्षित लोक आणि त्यांच्या सततच्या मागणीमुळे येथील स्थानिक नगरसेवक शत्रुघ्न काटे व नगरसेविका निर्मला कुटे या प्रकल्पाबाबत स्वतः आग्रही होते. 

साबण, हात धुतल्यानंतर ते सुकविणारे मशिन, टच फ्री टँप, सँनेटरी नँपकिन डिस्पोझर यासारख्या सुविधांबरोबर आतील व्यक्ती बाहेर पडल्यावर स्वयंचलित यंत्रणेने ते उच्च दाबाच्या पाण्याने पुन्हा धुतले जाऊन त्याचे निर्जंतुकीकरण केले जाईल. त्यामुळे स्वच्छतेच्या सर्व बाजुंनी हे सुरक्षित आहे.

यावेळी, सहायक आरोग्याधिकारी विनोद बेंडाळे म्हणाले की, आपण सर्वच वैयक्तिक स्वच्छता पाळत असताना सार्वजनिक स्वच्छतेकडे मात्र दुर्लक्ष करतो. परंतु पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांची इच्छाशक्ती पाहता हा प्रकल्प तडिस जाऊन तो भविष्यात यशस्वीही होईल. निगडी येथे काही महिणे हा प्रकल्प राबविला गेला परंतु स्थानिक अडचणींमुळे तो काढावा लागला. "

सँमटेकचे संचालक शोभित गुप्ता म्हणाले यावेळी म्हणाले की,  "या स्वच्छतागृहाच्या एका युनिटची किंमत बारा लाख असून त्याला बसवायला पाच ते सहा लाख खर्च येतो, आंम्ही हे मोफत बसविले आहे. पिंपळे सौदागर मध्ये याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर संयुक्त सामाजिक जबाबदारी (सीएसआर) या तत्वावर कंपनी आणखी पाच युनिक या परिसरात बसवेल." 

Web Title: E-Toilet for women in Pimpale Saudagar