‘ई-वेस्ट’च्या आवाहनाला पुणेकरांचा प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जानेवारी 2017

पुणे - कॉम्प्युटर्स अँड मीडिया डीलर्स असोसिएशन (सीएमडीए) ने आयोजित ‘आयटी एक्‍स्पो’च्या प्रवेशद्वाराजवळच ई-वेस्ट कलेक्‍शनचा स्टॉल उभारण्यात आला आहे. पुणेकरांचा याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 

पुणे - कॉम्प्युटर्स अँड मीडिया डीलर्स असोसिएशन (सीएमडीए) ने आयोजित ‘आयटी एक्‍स्पो’च्या प्रवेशद्वाराजवळच ई-वेस्ट कलेक्‍शनचा स्टॉल उभारण्यात आला आहे. पुणेकरांचा याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 

सिंचननगर मैदानावर सुरू असलेल्या या ‘आयटी एक्‍स्पो’मध्ये पुणेकरांना अद्ययावत उत्पादने, बदल आणि ॲप्लिकेशन यांचे विस्तृत दालन पाहायला मिळत आहे. तंत्रज्ञानातील बदलांबरोबरच पर्यावरण समतोल राखण्याच्या हेतूने उभारण्यात आलेल्या या प्रदर्शनाला भेट देणारे नागरिक आपल्याकडील ई-कचरा (मोबाईल, लॅपटॉप, आयपॅडस, प्रिंटर्स, सीडीज आदी) येथील ‘ई-वेस्ट’ स्टॉलला देऊ शकतात. या अभिनव उपक्रमाला पर्यावरणप्रेमींचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

‘सीएमडीए’ पुणेचे अध्यक्ष संजीव पाठारे म्हणाले, ‘‘सीएमडीए आयटी एक्‍स्पो’ला पुणेकरांनी दरवर्षी भरभरून प्रतिसाद दिला आहे. ‘ई-वेस्ट’च्या आवाहनालाही साद दिली आहे. डिजिटायझेशनच्या क्रांतीमध्ये आयटी उत्पादने आणि उपकरणांचा वापर वाढणार आहे. त्यामुळे ई-वेस्ट मॅनजमेंटला महत्त्व येईल.’’ ई-वेस्ट कलेक्‍शनचा उपक्रम संपूर्ण वर्षभर सुरू ठेवण्याचा आमचा प्रयत्न असून, पुण्यातील प्रत्येक वॉर्डात ई-वेस्ट सेंटर सुरू करण्याचा विचार सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: e-waist collection stall