ई वेस्ट संकलन अन्‌ पथनाट्यातून जनजागृती 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

पुणे - महापालिकेने राबविलेल्या "प्लॅस्टिक व ई वेस्ट' कचरा संकलन उपक्रमात सुमारे सात हजार किलो कचरा जमा झाला. पथनाट्य, स्वच्छताविषयक गाण्यांच्या माध्यमातून जनजागृती केली गेली. 

पुणे - महापालिकेने राबविलेल्या "प्लॅस्टिक व ई वेस्ट' कचरा संकलन उपक्रमात सुमारे सात हजार किलो कचरा जमा झाला. पथनाट्य, स्वच्छताविषयक गाण्यांच्या माध्यमातून जनजागृती केली गेली. 

प्लॅस्टिकच्या पिशव्यांसह आणि थर्माकोलपासून बनविण्यात आलेल्या ताट, कप, ग्लास, वाटी, चमच आदी वस्तूंचे उत्पादन, वापर, साठवणूक, वितरणावर राज्य सरकारने बंदी घातली आहे. महाराष्ट्र प्लॅस्टिक व थर्माकोल विघटनशील वस्तूंचे अधिनियम जारी केला आहे. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महापालिकेने रविवारी (ता. 6) उपक्रम राबविला. या उपक्रमात "प्लॅस्टिक, थर्माकोल, ई कचरा' गोळा करण्यासाठी पंधरा क्षेत्रीय कार्यालयांतील 200 आरोग्य कोठीत व्यवस्था केली होती. या उपक्रमात सहभागी होत नागरिकांनी एकूण 6 हजार 863 किलो कचरा जमा केला. यामध्ये 5 हजार 880 किलो प्लॅस्टिक, 1 हजार 718 किलो थर्माकोल, 225 किलो ई कचरा जमा झाला. या उपक्रमाचे उद्‌घाटन महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते महात्मा फुले मंडई येथे लोकमान्य टिळक पुतळ्याजवळ झाले. या वेळी खासदार अनिल शिरोळे, महापालिका आयुक्त सौरभ राव आदी उपस्थित होते. 

प्लॅस्टिक न वापरण्याचे आवाहन 
नागरिकांना प्लॅस्टिक, थर्माकोलचा वापर न करण्याचे आवाहन केले. या वेळी संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन, जनवाणी यांनी पथनाट्य सादर केली. महापालिकेच्या कामगार युनियनच्या कॉ. अण्णा भाऊ साठे कलापथकाने स्वच्छतेविषयीची गीते सादर केली. 

Web Title: E-waste collection and public awareness from streetlights