प्रत्येक रुग्ण आमच्यासाठी आव्हान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मार्च 2017

कामावर रुजू झालेल्या डॉक्‍टरांची भावना; मागण्यांना पाठिंबा
पुणे - सध्या आम्ही रोजच्या रोज किती रुग्ण तपासतो, याची मोजदादच नाही. प्रत्येक रुग्ण हे आमच्यासाठी एक नवे आव्हान आहे. त्याच्या रोगनिदानात, उपचारात झालेली किंचितशी चूकही महागडी ठरेल. त्यामुळे संपाची दाहकता वाढेलच; पण डॉक्‍टरांचे मनोबलही खच्ची होईल, अशी भावना कामावर रुजू असलेल्या डॉक्‍टरांनी व्यक्त केली.

कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या हमीसाठी राज्यातील चौदा वैद्यकीय महाविद्यालयांतील सुमारे साडेचार हजार निवासी डॉक्‍टरांनी बेमुदत रजा आंदोलन पुकारले आहे. आज या सामूहिक रजा आंदोलनाचा तिसरा दिवस
आहे. या पार्श्‍वभूमीवर बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न ससून रुग्णालयात रुग्णसेवा देणाऱ्या डॉक्‍टरांशी "सकाळ'ने संवाद साधला. त्या वेळी त्यांनी ही भावना व्यक्त केली.

'आम्ही वरिष्ठ डॉक्‍टर आहोत. त्यामुळे सामूहिक रजा आंदोलनात थेट सहभागी होता येत नाही. मात्र, त्यांच्या मागण्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. कामाच्या ठिकाणी सुरक्षितता ही महत्त्वाची असते. त्याशिवाय मोकळेपणाने काम करता येणार नाही.''

रुग्णालयात रोजचे दोन-अडीच हजार रुग्ण असतात. हजारभर रुग्ण उपचारांसाठी वेगवेगळ्या वॉर्डमध्ये दाखल असतात. या रुग्णसेवेत निवासी डॉक्‍टरांची मोलाची मदत असते. हे डॉक्‍टर कामावर नसल्याने रुग्णसेवेचा ताण वाढला आहे. रुग्णांना नाकारता येत नाही. त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. त्यांना दुसरीकडे जावे, असेही सांगता येत नाही. अशा परिस्थितीत त्यांच्यावर उपचार करणे हेच एक लक्ष्य निश्‍चित करून गेले तीन दिवस घड्याळाकडे न बघता काम करत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

निवासी डॉक्‍टर हे कोणत्याही सरकारी रुग्णालयाचा पाठीचा कणा असतो. नेमके हेच डॉक्‍टर गेलेल्या रुग्णाच्या नातेवाइकांच्या हल्ल्याचे लक्ष्य ठरले आहेत. ही एकच घटना असती तर कदाचित त्याकडे अपघात म्हणून बघितले असते. मात्र, वस्तुस्थिती वेगळी आहे. एकाच आठवड्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले झाले आहेत. ही निश्‍चित स्वीकाहार्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: each patient is a challenge for us