श्रवणयंत्रांमुळे ज्येष्ठांना कर्णसंजीवनी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

कात्रज - वार्धक्‍याने आलेला बहिरेपणा, त्यामुळे होणारी हेटाळणी, कुटुंबातील मनस्ताप आणि बाहेर वावरताना वाटणारी असुरक्षितता आदी समस्यांनी हतबल झालेल्या सव्वासहाशे ज्येष्ठांनी अनेक वर्षांनी स्नेहीजनांचा आवाज ऐकताच त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही... 

निमित्त होते धनकवडी येथे मोफत श्रवणयंत्र वाटप उपक्रमाचे. या प्रसंगी ज्येष्ठांनी श्रावणारंभी श्रवणोत्सव साजरा केला. 

अमेरिकेच्या स्टार्की फाउंडेशनच्या सहकार्याने खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नातून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, अपंग हक्क विकास मंच, आरव्हीएम फाउंडेशन, विद्या प्रतिष्ठान, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, ठाकरसी ग्रुप व महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. धनकवडी, वारजे, मुळशी, हंडेवाडी येथे झालेल्या कर्णदोष तपासणी शिबिरातील निवडक ज्येष्ठांना या वेळी श्रवणयंत्रे देण्यात आली. राज्य अपंग कल्याण विभागाचे आयुक्त रूचेश जयवंशी यांनी मनोगत 
व्यक्त केले.

धनकवडी येथील लोकनेते शरदचंद्र पवार बहुउद्देशीय भवनात नगरसेवक विशाल तांबे, बाळाभाऊ धनकवडे, अश्विनी भागवत यांनी श्रवणयंत्र वाटप, यंत्र कानात बसवण्याचे प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते. या वेळी स्टार्की फाउंडेशनचे अध्यक्ष रोहित मिश्रा, डॉ. राहुल सलेशा, डॉ. प्रतीक निर्मळ, सचिन दोडके, सुनील चांदेरे, काका चव्हाण, नगरसेवक युवराज बेलदरे उपस्थित होते.

पंचवीस हजार लाभार्थ्यांना वाटप
जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांपासून गरजूंना श्रवणयंत्रांचे वाटप केले जात आहे. या मोहिमेत आतापर्यंत पंचवीस हजार लाभार्थ्यांना पन्नास हजार श्रवणयंत्रे देण्यात आल्याची माहिती जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राचे प्रकल्प संचालक विजय कानेकर यांनी दिली.

Web Title: ear machine old people supriya sule