Pune : पिंपळगावच्या माहेरवासीणची कमवा आणि शिकापासून ते आयपीएसपर्यंत भरारी

पिंपळगावची कन्या अश्विनी सानप यांची आयपीएस केडरमध्ये निवड झाल्याबद्दल त्यांना पिंपळगाव भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
Pune
Punesakal

केडगाव : पिंपळगावची कन्या अश्विनी सानप यांची आयपीएस केडरमध्ये निवड झाल्याबद्दल त्यांना पिंपळगाव भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. माहेरच्या माणसांकडून झालेल्या कोडकौतुकामुळे सानप या भारावून गेल्या.

कमवा आणि शिका योजनेतून शिकलेल्या पोलिस अधीक्षक अश्विनी सानप यांची केंद्र सरकारने नुकतीच आयपीएस केडरसाठी निवड केली. सानप या पिंपळगावच्या कानडखेल येथील जिल्हा परिषदेच्या भाग शाळेत शिकल्या आहेत. या निवडीबद्दल सानप यांचे तालुक्यात कौतुक होत आहे. निवृत्त न्यायाधीश रणजितसिंह चव्हाण व ग्रामस्थांनी सत्काराचे आयोजन केले होते. शांतीनाथ महाराज यांच्या हस्ते मानपत्रासह पिंपळगाव भूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

अश्विनी सानप यांचे आई वडिल व पती विक्रीकर उपायुक्त संतोष सानप यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास शांतीनाथ महाराज, पोलिस निरीक्षक नारायण पवार, सरपंच शुभांगी पासलकर, सर्जेराव जेधे, राजेंद्र थोरात, नितीन म्हेत्रे, संजय इनामके, नारायण जगताप, चंद्रकांत नातू, ईश्वर कापरे, अॅड. मानसिंग शितोळे, कैलास बधे, डॉ. यशवंत खताळ, अॅड. बाळासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.

यावेळी सानप म्हणाल्या, ''माहेरच्या माणसांकडून झालेला सन्मान आणि प्रेम कायम लक्षात राहिल. २० वर्षांनंतर गावात आले आहे. शाळेतील आई वडिल, शिक्षक, विद्यार्थी सहायक समितीमधील संस्कार, सासरच्या माणसांनी दिलेला पाठिंबा यामुळे मला पोलिस दलात चांगले काम करता आले. स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी माझे सहकार्य नेहमी असेल. यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांना सुविधा दिल्या पाहिजेत. पालकांनी आपल्या मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. खडतर कष्टाला पर्याय नाही.

सानप यांनी प्रारंभी ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. शाळेला भेट दिली. ग्रामस्थांनी त्यांची सवाद्य मिरवणूक काढली. विविध संस्था, संघटना, वर्ग मित्र यांच्यावतीने सानप यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभाला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ह. भ. प. शांतीनाथ महाराज यांनी मनोगत व्यक्त केले. रामचंद्र नातू यांनी सूत्रसंचालन केले तर राजेंद्र थोरात यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com