सहजतेने परिक्षेला सामोरे जाऊ

Easily face examinations
Easily face examinations

बारामती शहर : दहावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमाबाबत मनात अनेक शंका होत्या, मात्र आज 'सकाळ'च्या वतीने आयोजित कार्यक्रमातील अत्यंत उपयुक्त मार्गदर्शनानंतर आम्ही अत्यंत सहजतेने परिक्षेला सामोरे जाऊ....अशी बोलकी प्रतिक्रीया आज विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. 'सकाळ' माध्यम समूहाच्या वतीने दहावीच्या परिक्षेत यशाचा हमखास मार्ग दाखविण्याच्या उद्देशाने रविवारी (ता. 26) पालक, विद्यार्थी व शिक्षकांसाठी कार्यशाळेचे आयोजन केले गेले.

या कार्यशाळेनंतर विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त करीत या कार्यशाळेतून परिपूर्ण मार्गदर्शन मिळाल्याची भावना व्यक्त केली. सिम्बॉयसेसच्या प्रा. प्राजक्ती गोखले, विज्ञान विषय अभ्यासक्रम तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष व प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरुमकर तसेच संदीप चोरडीया यांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाने विद्यार्थी भारावून गेले होते. वसंतराव पवार सभागृह आज विद्यार्थ्यांच्या गर्दीने फुलून गेले होते.
 
या प्रसंगी 'सकाळ'चे वितरण व्यवस्थापक योगेश निगडे, बारामती वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष विजय सणस, प्रायोजक एलआयसीचे विक्री अधिकारी मिलिंद कळंत्रे आदी उपस्थित होते. प्राजक्ती गोखले यांनी गणित या विषयाबाबत, डॉ. मुरुमकर यांनी विज्ञान तर संदीप चोरडीया यांनी सर्वसमावेश अभ्यासाबाबत मार्गदर्शन केले. योगेश निगडे यांनी स्वागत केले, वितरण सहायक व्यवस्थापक मनोज काकडे यांनी सूत्रसंचालन केले. सकाळतर्फे दीपक महाडीक, गणेश चव्हाण, नीलेश देशमुख, शशिकांत जगताप आदी उपस्थित होते.

पुस्तकांना तंत्रज्ञानाची जोड

दहावीचे गणिताचे पुस्तक निव्वळ पुस्तक नाही त्यात क्यूआर कोड, विविध लिंक, यूट्यूबवरील माहिती आदींचीही माहिती आहे. पुस्तकाला तंत्रज्ञानाची जोड देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या पुस्तकांचे सखोल वाचन गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी विनाकारण तणाव घेण्यापेक्षा ही प्रक्रीयेचा आनंदा घ्यावा. संकल्पना स्पष्ट झाल्या तर काहीच अवघड नाही. जीएसटी, मूल्यमापन, कृतीपत्रिका याबाबी नीट समजून घ्याव्यात. शिकण्याचे पॅशन अंगी बाणवा गुण आपोआप तुमच्या मागे येतील.
- प्राजक्ती गोखले

विज्ञानाची संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे

दहावीचा अभ्यासक्रम तयार करताना मुलांना संकल्पना स्पष्ट होऊन त्यांच्या अंगी संशोधनवृत्ती वाढीस कशी लागेल याचा विचार करण्यात आला आहे. विविध भाषांतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याना नजरेसमोर ठेवून अभ्यासक्रम तयार केला आहे. सर्वांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला गेला. अभ्यासक्रमाचे स्वरुप बदलले आहे, शिक्षक हा मदतनीस किंवा सहकारी व्हावा व मुलांनीच विषयाचे आकलन करावे अशी रचना आहे.
- डॉ. चंद्रशेखर मुरुमकर

आनंददायी शिक्षणाचा प्रयत्न
दहावीचे वर्ष महत्वाचे असतेच मात्र सर्व विषयांचा अभ्यास करताना कोणताही तणाव न घेता तो करणे गरजेचे आहे. विषयाचे आकलन होणे व मूळ संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे आहे. शिक्षणाचे स्वरुप बदललेले आहे, बदलत्या शिक्षणाच्या स्वरुपानुसार केवळ पाठांतर करणे किंवा परिक्षा देणे अपेक्षित नाही, विषयाचे परिपूर्ण आकलन व संकल्पना स्पष्टता गरजेची आहे.
-संदीप चोरडीया.

दहावीच्या अभ्यासक्रमाची नेमकी दिशा कशी असावी याची माहिती या कार्यक्रमाने मिळाली, पुढील जीवनात निश्चित फायदा होईल
- भाग्यश्री शिंदे, विद्यार्थीनी

परिपूर्ण मार्गदर्शनाचा आम्हाला दहावीची परिक्षा देताना निश्चित उपयोग होईल असे कार्यक्रम वारंवार व्हावेत.
- वैष्णवी गायकवाड, विद्यार्थीनी 

'सकाळ'चा कार्यक्रम मार्गदर्शनदृष्टया उत्तम होता मात्र पुढील कार्यक्रमात भाषातज्ज्ञांचीही व्याख्याने व्हायला हवीत
- प्रदीप सरवदे, पालक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com