ई-बसची कमाई अपेक्षेपेक्षा कमी

e-bus
e-bus

पुणे - पीएमपीच्या पर्यावरणपूरक ई-बसला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. एका महिन्यात २५ ई-बसने सुमारे ५२ लाख रुपयांची कमाई केली. उत्पन्नामध्ये वाढ होत असली तरी, ही कमाई अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

शहरामध्ये १२ फेब्रुवारीला ई-बस सेवा सुरू करण्यात आली. ही सेवा सात मार्गांवर सुरू आहे. पीएमपीला फेब्रुवारीमध्ये एक ई-बस प्रतिदिन साडेपाच हजार रुपये कमावून देत होती. मार्चमध्ये ही संख्या वाढली असून, १ ते १७ मार्चदरम्यान एका ई-बसची कमाई दररोज साडेसहा हजार रुपये आहे. या वाढत्या उत्पन्नावरून प्रवाशांची ई-बसला पसंती मिळत असल्याचे दिसून येते. डिझेल आणि सीएनजी बसला होणाऱ्या खर्चापेक्षा ई-बसचा खर्च कमी आहे. त्यामुळे ई-बस पीएमपीला जास्त उत्पन्न देत आहे, असे प्रशासनाने सांगितले.

  ई-बस - २५, ई- बस मार्ग - ७ , चार्जिंग स्टेशन - २
  १२ ते २८ फेब्रुवारीदरम्यानचे उत्पन्न - २३ लाख ७५ हजार २५
  १ मार्च ते १७ मार्चदरम्यानचे उत्पन्न - २८ लाख २९ हजार ४१५
  ई-बसचे अपेक्षित उत्पन्न - ४० रुपये प्रतिकिलोमीटर
  ई-बसचे प्रत्यक्षात मिळणारे उत्पन्न - ३१ रुपये प्रतिकिलोमीटर
  ई-बसचा खर्च - ४ रुपये प्रतिकिलोमीटर
  एका बसची प्रवासी संख्या - सुमारे१ हजार प्रतिदिन

प्रवाशांना सुलभ आणि आधुनिक सेवा मिळावी, हा प्रशासनाचा उद्देश आहे. त्या दृष्टीने प्रयत्न केले जाते आहेत. सर्व ई-बस मार्गांवर उतरविण्यात येत असून, प्रवाशांचा या बसला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- सुभाष गायकवाड, जनसंपर्क अधिकारी, पीएमपी

ई-बसचा अपेक्षापेक्षा खूप छान अनुभव होता. अतिशय चांगली अंतर्गत सजावट, हिरवे मॅट आणि वातानुकूलन व्यवस्था यामुळे प्रवास चांगला वाटला. नेहमीच्या बससारखा आवाज आणि ब्रेक मारल्यावर बसणारे धक्के जाणवत नव्हते. 
- अमोल देशपांडे, प्रवासी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com