पंचग्यापासून बनविल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

सोमाटणे - आढलेतील ‘पंचग्या’पासून बनविण्यात आलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना मागणी वाढली आहे. विशेषतः यातून अनेक स्थानिक महिलांना रोजगार मिळाला आहे. आढले बुद्रुक येथील नितीन घाेटकुले यांनी बनविलेल्या अनोख्या गणेशमूर्ती सर्वांचे आकर्षण ठरल्या आहेत. 

सोमाटणे - आढलेतील ‘पंचग्या’पासून बनविण्यात आलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना मागणी वाढली आहे. विशेषतः यातून अनेक स्थानिक महिलांना रोजगार मिळाला आहे. आढले बुद्रुक येथील नितीन घाेटकुले यांनी बनविलेल्या अनोख्या गणेशमूर्ती सर्वांचे आकर्षण ठरल्या आहेत. 

हिंदू धर्मात गाय पवित्र मानली जाते तिच्या रक्षणासाठी घाेटकुले यांनी दहा वर्षांपूर्वी गोशाळा सुरू केली. त्यांच्या या गोशाळेत सध्या दीडशे देशी गाई आहेत. मात्र वर्षभरापूर्वी त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर या गाईचे शेण, मूत्र, दूध, दही, तूप आणि पांढऱ्या मातीपासून तयार केलेल्या पंचग्याचा उपयोग करून गणेशमूर्ती तयार केल्या. या मूर्ती रंगविण्यासाठी त्यांनी जांभूळ, हळद अशा वनस्पतिजन्य पदार्थांपासून रंग तयार केला. पूर्णतः पर्यावरणपूरक अशा या मूर्ती नागरिकांनाही रुचल्या. अल्पावधीत या मूर्तींना मागणीही वाढली. 

महिलांना दिले प्रशिक्षण
उपक्रमाच्या पहिल्याच वर्षी या मूर्तींना मोठी मागणी होती. मात्र या मूर्ती बनविणे तसे जिकिरीचे काम. तसेच त्या बनविण्यासाठी बराच वेळ लागतो. त्यांच्या रंगरंगोटीसाठीही बरीच मेहनत घ्यावी लागते. त्यामुळेच मागील वर्षी मूर्तींचा तुटवडा निर्माण झाला होता. मात्र त्यावर 

पर्याय शोधत घाेटकुले यांनी स्थानिक महिलांना गणेशमूर्ती बनवण्याचे विशेष प्रशिक्षण दिले. त्यातून अनेक मूर्तिकार महिला उपलब्ध झाल्या. त्यांच्या मदतीने घाेटकुले यांनी या वर्षी मोठ्या संख्येने मूर्ती बनविल्या आहेत. विशेषतः या उपक्रमातून अनेक स्थानिक महिलांना रोजगार उपलब्ध झाले आहेत. सध्या मूर्ती बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, रंगकामाला सुरवात झाली आहे. 

व्यवसाय म्हणून मी या गणेशमूर्ती तयार केलेल्या नाहीत, तर गाईचे महत्त्व सर्वांना कळावे. तसेच महिलांना रोजगार मिळावा हा यामागील उद्देश आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर हा उपक्रम राबविण्यात येत आहे. गोमूत्र व औषधी वनस्पतींपासून जुनाट रोगावरील प्रभावी औषधेही आम्ही तयार करीत आहोत.
- नितीन घाेटकुले

मूर्तीची वैशिष्ट्ये
 या मूर्ती पाण्यात टाकल्यानंतर त्वरित विरघळतात
 मूर्ती विरघळल्यानंतर तयार होणाऱ्या द्रावणाचा खत म्हणून उपयोग

Web Title: Eco-friendly Ganesh idol built from Panchgya