पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून सर्वांनीच आनंद द्विगुणीत करावा - डॅा. चेतन म्हस्के

संदीप जगदाळे
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

हडपसर - वाढते प्रदूषण, पर्यावरणाचा ऱ्हास, ग्लोबल वॉर्मिंग आदींमुळे सजीवसृष्टीपुढे अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. प्रदूषण थांबवून पर्यावरणाचा समतोल राखण्याचे आव्हान मानवापुढे उभे आहे. गणेशोत्सव काळातही मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी होत असते. पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून सर्वांनीच आपला आनंद द्विगुणीत केला 
पाहिजे, असे मत डॅा. चेतन म्हस्के यांनी व्यक्त केले.

पाण्यामध्ये पटकन विरघळणाऱ्या आणि रासायनिक रंगाचा वापर नसलेल्या इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण हडपसर मेडिकल असोसिएशन तर्फे घेण्यात आले, याप्रसंगी डॅा. म्हस्के बोलत होते. या कार्यशाळेसाठी हडपसर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ शंतनू जगदाळे, सचिव डॉ. सचिन आबणे, कोषाध्यक्ष डॉ .प्रशांत चौधरी, उपाध्यक्ष डॉ. राहुल झांज्रुर्णें, सहसचिव डॉ. मंगेश बोराटे, डॉ. अजय माने, डॉ. सुवर्णा गायकवाड, डॉ. रोशनी कावळे यांनी प्रयत्न केले. तसेच असोसिएशनचे ज्येष्ठ सभासद डॉ. मंगेश लिंगायत, डॉ. कमलाकर गजरे, डॉ. मनीष शहा, डॉ. धनंजय व्हलवणकर डॉ. राजेश कोद्रे आणि डाॅ. सतीश साकोरे यांचे सहकार्य लाभले. रामचंद्र बनकर शैक्षणिक क्रिडा संकुलात या कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत २०० जणांनी सहभाग घेतला. डॉ. चेतन म्हस्के आणि डाॅ. गणपत शितोळे यांनी गणेश मुर्ती बनविण्याचे प्रशिक्षण दिले. तसेच शाडूमातीच्या गणेश मुर्ती कशा पर्यावरणपूरक आहेत याची माहिती दिली. डॉ शितोळे यांनी हडपसर परिसरातील विविध शाळा तसेचगृहप्रक्लप येथे 39 कार्यशाळा घेतल्या आहेत. सहभागी प्रशिक्षणार्थींना प्रशस्तीपत्रकं डॉ. म्हस्के आणि डाॅ. शितोळे यांच्या हस्ते देण्यात आली. 

Web Title: eco friendly Ganesha Festival celebrates everyone's happiness - DA Chetan Mhaske