कलात्मक इको-फ्रेंडली वस्तू वेधतात लक्ष

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

मजबूत, टिकाऊ, दिसण्यास सुंदर, खिशाला परवडणारे आणि इको-फ्रेंडली, बांबूपासून बनविलेले आकाश कंदील, फुलदाणी, टेबल लॅम्प मोशी, पुणे-नाशिक महामार्गालगतच्या रस्त्यावरील या वस्तू नागरिकांचे लक्ष वेधून घेतात.

मोशी - मजबूत, टिकाऊ, दिसण्यास सुंदर, खिशाला परवडणारे आणि इको-फ्रेंडली, बांबूपासून बनविलेले आकाश कंदील, फुलदाणी, टेबल लॅम्प मोशी, पुणे-नाशिक महामार्गालगतच्या रस्त्यावरील या वस्तू नागरिकांचे लक्ष वेधून घेतात. 

मोशी-प्राधिकरणातील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राजवळून जाणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गालगत आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममधील बांबू कलाकारांनी स्वतः तयार करून या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या आहेत.

आंध्र प्रदेश-विशाखापट्टणम येथील हे कलाकार येथेच बांबूपासून वस्तू बनवून त्या विक्रीसाठी ठेवत आहेत. याविषयी दासरे मस्तानैय्या, दासरी सुबैय्या, रोडा मल्लिकार्जुन, पी. सीनू, डी. अंजी म्हणाले, की पुण्यात कलेची जाण असलेले व कलेला दाद देणारे नागरिक आहेत, हे ऐकून आम्ही येथे आलो आहोत. आंध्र प्रदेशात मुबलक बांबूचे उत्पादन होते. त्याचा उपयोग करून रंगीबिरंगी आकाश कंदील, फुलदाणी, टेबल लॅम्प, घरात लागणाऱ्या टोपल्या, पाट्या, दिवाणखाना सजविण्यासाठी आणि बैठक व्यवस्थेसाठी सोफासेट, पलंग, आदींसह लटकत्या आराम खुर्च्या, डायनिंग टेबल आम्ही बनवितो. कुटुंबातील दासरी मस्तानैय्या, दासरी सुबैय्या, रोडा मल्लिकार्जुन, सीनू हे या वस्तू तयार करतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eco Friendly Goods