इको फ्रेंडली आकाशकंदिलांना मागणी

रहाटणी - आकाशकंदील बनविण्याची सुरू असलेली लगबग.
रहाटणी - आकाशकंदील बनविण्याची सुरू असलेली लगबग.

पिंपरी - दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर शहरात महिला कलाकारांची आकाशकंदील बनविण्याची लगबग सुरू आहे. या वर्षी प्लॅस्टिकच्या कंदिलांना फाटा देत इको फ्रेंडली, तसेच विविध आकर्षक व पर्यावरणपूरक कंदिलांना मागणी वाढली आहे.

काळेवाडीतील कारखान्यात गेल्या दहा वर्षांपासून पंधरा ते वीस महिला एकत्रित येऊन आकाशकंदील बनविण्याचे काम करीत आहे. त्यांनी केवळ पर्यावरणपूरक साहित्यांचा वापर करून आकर्षक कंदील बनविले आहेत. प्लॅस्टिकला बंदी असल्याने कंदिलात पुठ्ठ्याचा वापर केला जात आहे. आकर्षक सजावटीसाठी मणी, विविधरंगी दोऱ्या, पेपर कोटिंग, कुंदन, झिरमिळ्या, मणी, टिशूलेस, लोकरचा वापर केला आहे.

कंदिलाच्या किंमत दीडशे रुपयांपासून ते एक हजार रुपयांपर्यंत आहेत. या वर्षी कच्या मालाच्या भावात वाढ झाली असली, तरी त्याचा परिणाम कंदिलाच्या किमतीवर झालेला नाही. नव्याने आलेल्या वेलवेट कंदिलांनाही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मणी, कुंदन, लेस बांधणीचे काम नाजूक असल्याने या कामासाठी वेळ लागतो. सीझनेबल व्यवसायामुळे महिलांच्या हातांना काम मिळत आहे. सीझन संपला की पुन्हा पुढील वर्षाच्या विविध कामांचे नियोजन केले जात आहे. 

‘आमचे शिक्षण कमी असल्यामुळे आम्हाला काम मिळत नव्हते. सणांच्या कालावधीत हाताला काम मिळत असल्याने आम्हाला रोज दोनशे ते तीनशे रुपये मिळतात,’’ असे रहाटणीतील रमावती चव्हाण यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com