गोष्ट एका पर्यावरण पूरक लग्नाची...

मिलिंद संधान
गुरुवार, 3 मे 2018

नवी सांगवी (पुणे) - बाणेर येथील अनिल गायकवाड यांनी आपला मुलगा चंदन व विशालनगर येथील राजेश घोलप यांची बहिण पूनम यांनी अनावश्यक खर्चाला फाटा देऊन पर्यावरण पुरक लग्नाचा आदर्श समाजापुढे उभा केला आहे.

नवी सांगवी (पुणे) - बाणेर येथील अनिल गायकवाड यांनी आपला मुलगा चंदन व विशालनगर येथील राजेश घोलप यांची बहिण पूनम यांनी अनावश्यक खर्चाला फाटा देऊन पर्यावरण पुरक लग्नाचा आदर्श समाजापुढे उभा केला आहे.

चंदन आणि पूनम हे सोमेश्वरवाडीतील एका मंगल कार्यालयात नुकतेच विवाह बंधनात अडकले. लग्नमंडप, व्यासपिठ, नवरा नवरीची गाडी हे सजवित असताना थर्माकोल अथवा प्लास्टिकचा कोठेही वापर केला नाही. पानफुलांची जी काय सजावट करता येईल तेवढेच केले. कर्कष्य गाणी नाही, फटाक्यांचा धूर नाही एवढेच काय तर लग्नाला उपस्थित असणाऱ्या सन्मानियांच्या सत्काराचा सावळा गोंधळही नाही. याउलट 'माझे ध्येय स्वच्छ वसुंधरा' असे ब्रीद लिहलेल्या टोप्या देऊन त्यांचा सन्मान केला व जेवणातही सेंद्रीय खते वापरून उगविलेला भाजीपाला व अन्नधान्य यांचाच वापर केला. 

विषमुक्त अन्न या चळवळीत घोलप आणि गायकवाड हे दोन्ही कुंटुंब अनेक वर्षापासून सक्रीय आहेत. देशी गाईचे शेण आणि गोमुत्र वापरलेले खत व दहा झाडांची पाने (दशपर्णी) एकत्रीत करून त्यापासून तयार केलेले किटकनाशके फवारून उगविलेले शुध्द अन्नधान्याचा प्रसार हे कुटुंबिय अनेक वर्षे करीत आहेत.   

शेतकऱ्याच्या घामातून उगविणारा कापूस आणि त्यापासून तयार होणारी खादी ही तिन्ही ऋतुत वापरण्यास फायदेशीर आहे हे आर्युवेदाने स्पष्ट केले आहे. तर पेट्रोलियम पदार्थापासून बनविलेले टेरीकॉट हे शरीरास अपायकारक तर आहेच परंतु त्याचा पैसा थेट कारखानदाराच्या खिशात जात असल्याने साहजिकच लग्नातही खादीलाच प्राधान्य दिले.

नवरदेवाचे वडिल अनिल गायकवाड म्हणाले, "जागतिक तापमान वाढ व त्यामुळे हवामानात होणारा बदल हे संकट पाहता आंम्ही या वसुंधरा स्वच्छता अभियान अनेक वर्षापासून राबवित आहोत. बाणेर येथील रामनदी स्वच्छता, बाणेर बालेवाडी भागात पंचवीस हजार पेक्षाही अधिक वृक्षे लाऊन ती जपली आहेत. लग्नात वाचलेले पन्नास हजार रूपये सेवाभावी कार्यास देण्यात आले. "

Web Title: eco friendly wedding