वाहतूक समस्येवर ई-सायकलचा पर्याय - अरुण फिरोदिया

वाहतूक समस्येवर ई-सायकलचा पर्याय - अरुण फिरोदिया

पुणे - ‘जगातील वाहन उद्योग इलेक्‍ट्रॉनिक वाहनांच्या निर्मितीकडे वळत आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलवरील वाहनांची जागा ई-वाहने घेणार आहेत. एकेकाळी सायकलींचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यासाठी ई-सायकली वरदान ठरणार आहेत. ताशी २५ किलोमीटर वेगाने धावणाऱ्या ई-सायकली शहराच्या वाहतूक समस्येसाठी योग्य पर्याय ठरणार आहेत,’’ असे मत उद्योगपती अरुण फिरोदिया यांनी व्यक्त केले. 

सॉफ्टवेअर टेक्‍नॉलॉजी पार्क्‍स ऑफ इंडियातर्फे पुण्यात पहिल्या ‘मोशन’ या वाहन उद्योगासाठीच्या सुविधा केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी एसटीपीआयचे महासंचालक ओंकार राय, मोशनचे मुख्य सल्लागार डॉ. गणेश नटराजन, पुणेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. बी. अहुजा, अनिरुद्ध कुलकर्णी, डॉ. ए. के. गर्ग उपस्थित होते. 

फिरोदिया म्हणाले, ‘‘ई-वाहनांच्या प्रमाणिकरणासाठी सरकारने व्यवस्था उभी करावी. बॅटरीची काळजी न घेतल्यामुळे ई-वाहने अनेकदा बंद पडतात. त्यामुळे वाहनांची विश्वासार्हता धोक्‍यात येते. त्यामुळे चालकांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे.’’  डॉ. राय म्हणाले, ‘‘नववाहन उद्योजकांसाठी ‘मोशन’ हे प्रयोगशील केंद्र बनणार आहे. नवकल्पनांबरोबरच पूरक वातावरण आणि मदत या केंद्राद्वारे मिळणार आहे.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com