MP Supriya Sule
MP Supriya Sulesakal

महाराष्ट्रात आत्ता ईडीचे सरकार - खासदार सुप्रिया सुळे

महाराष्ट्रात सध्या ईडीचे सरकार असून विकास कामाबाबत, शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत या सरकारमधील मंत्र्यांना वेळ नसल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
Summary

महाराष्ट्रात सध्या ईडीचे सरकार असून विकास कामाबाबत, शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत या सरकारमधील मंत्र्यांना वेळ नसल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

वेल्हे - महाराष्ट्रात सध्या ईडीचे सरकार असून विकास कामाबाबत, शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत या सरकारमधील मंत्र्यांना वेळ नसल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

वेल्हे तालुक्यातील विविध विभागांच्या कामाची आढावा बैठक, व पक्षातील कार्यकर्त्यांशी संवाद वेल्हे येथील शिव गोरक्ष कार्यालयात सोमवार ता.२२रोजी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ऐतिहासिक अशा वेल्हे तालुक्यातील किल्ले राजगड व तोरणा तसेच राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या सईबाई समाधी स्मृती स्थळासाठी महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीमध्ये पन्नास कोटी रुपये मंजूर केले होते. त्याचा विकास आराखडा तयार केला आहे का? त्याचे पुढे काय? असा प्रश्न विचारला असता खासदार सुळे म्हणाल्या, या सरकारला मंत्रिमंडळ स्थापन करण्यात वेळ घालवला तर राज्यातील विविध प्रश्नांबाबत यांच्याकडे वेळ नसून हे सरकार ईडीचे सरकार असल्याची टीका त्यांनी केली.

वेल्हे तालुक्यातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून रस्त्यासाठी निधी आणला जाईल, वेल्हे तालुक्यातील प्रलंबित असणाऱ्या प्रशासकीय इमारती व न्यायालयाच्या बाबतीत सकाळ प्रतिनिधींनी लक्ष वेधले असता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या सूचनानुसार जागा निश्चिती करण्यासाठी पाणी स्थळ पाहणी केली असून, याबाबत लवकरच तोडगा काढला जाईल.

वेल्हे येथील बंद झालेली पीएमटी सेवा, किल्ले राजगड, तोरण्यावर पुरातत्व विभागाच्या वतीने येथील स्थानिक भूमिपुत्रांना किल्ल्यावरती खाद्यपदार्थ विकण्यासाठी बंदी घातली असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ, धरणग्रस्तांचे पुनर्वसन तसेच त्यांच्या गावठाणामधील मूलभूत सुविधा आधी विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, महिला अध्यक्ष भारती शेवाळे, जिल्हा बँकेचे संचालक रेवणनाथ दारवटकर व संचालिका निर्मला जागडे, बारामती लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक प्रवीण शिंदे, माजी तालुकाध्यक्ष शंकरराव भुरुक, तालुका अध्यक्ष संतोष रेणुसे, जिल्हा उपाध्यक्ष किरण राऊत, वेल्ह्याचे माजी सरपंच संतोष मोरे, गोरख भुरुक, आदीसह पत्रकार उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com