डीएसकेंची ‘ईडी’कडून येरवडा तुरुंगात चौकशी

डीएसकेंची ‘ईडी’कडून येरवडा तुरुंगात चौकशी

पुणे - बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी ठेवीदारांच्या केलेल्या आर्थिक फसवणुकीबाबत सक्त वसुली अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चौकशी करण्यास सुरवात केली आहे. डीएसके यांची चौकशी सुरू असून, त्यांचे कुटुंबीय व सनदी लेखपालांचीही चौकशी होणार आहे. 

ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके, त्यांच्या पत्नी हेमंती, मुलगा शिरीष यांची चौकशी करण्यासंदर्भात परवानगी मिळावी, असा विनंती अर्ज ‘ईडी’ने न्यायालयात केला होता. विशेष न्यायाधीश दिलीप मुरूमकर यांच्या न्यायालयात ‘ईडी’चे अधिकारी अजित काटकर, प्रवीण साळुंखे यांनी हा अर्ज सादर केला होता. न्यायालयाने हा अर्ज मंजुर करून चौकशीला परवानगी दिली. त्यानुसार ‘ईडी’ने येरवडा कारागृहात जाऊन डीएसकेंच्या चौकशीला सुरवात केली आहे. त्यानंतर हेमंती व शिरीष यांची चौकशी केली जाणार आहे.  

दरम्यान, डीएसकेंचे सनदी लेखापाल सुनील घाटपांडे यांच्या चौकशीबाबतची परवानगीही ‘ईडी’ने न्यायालयाकडे मागितली आहे. घाटपांडे यांच्या जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे त्यांची चौकशी ३० जुलैनंतर करण्यात यावी, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले. ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी डीएसकेंकडून कोणत्या प्रकारची चौकशी केली, याबाबतचे तपशील मिळू शकले नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com