#बेरोजगारी संवाद कौशल्य आवश्‍यक - ॲड. एस. के जैन

#बेरोजगारी संवाद कौशल्य आवश्‍यक - ॲड. एस. के जैन

सध्या वर्गात अध्यापक शिकवतात आणि विद्यार्थी ऐकतात. अध्यापन प्रभावी नसल्याने विद्यार्थी वर्गात बसत नाहीत. त्यासाठी आंतरसंवादी अध्यापन पद्धती सक्तीची केली पाहिजे.

पारंपरिक शाखांचे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्याला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, हे तपासण्याच्या आणि त्याविषयी मार्गदर्शन करण्याची व्यवस्था महाविद्यालयांमध्ये असलीच पाहिजे. 

बीए, बीकॉम, बीएस्सी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनाही इंटर्नशिप बंधनकारक केली पाहिजे. शिक्षण घेताना त्यांना संवाद कौशल्य शिकविण्याची जबाबदारी महाविद्यालयांनी घ्यावी.
(ॲड. जैन हे शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आहेत.)

----------------------------------------------------------------------------------------
मूल्यमापन सातत्याने हवे - प्रा. अरविंद नातू
व्यावसायिक पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमता वाढविणारी कौशल्य प्रशिक्षणे किंवा काही महिन्यांचे अभ्यासक्रम तयार करण्याची वेळ आली आहे.

शिक्षण संस्था आणि उद्योगांनी एकत्र येऊन हे अभ्यासक्रम तयार केल्यास रोजगारक्षमता वाढण्यास निश्‍चितपणे मदत होईल.

अभ्यासक्रमात ५० टक्के प्रात्यक्षिके आणि ५० टक्के थिअरी असावी. विद्यार्थ्यांच्या विचाराला चालना देण्यासाठी दरवर्षी एक संशोधन प्रकल्प पूर्ण करण्याचे बंधन असावे.

केवळ वार्षिक परीक्षेद्वारे विद्यार्थ्याचे मूल्यमापन करण्यापेक्षा ते वर्षभर सातत्याने करावे, यातून परीक्षेची भीती जाऊन ते चमकदार कामगिरी करू शकतील.

(प्रा. नातू हे भारतीय विज्ञान शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे (आयसर) सल्लागार आहेत.)

----------------------------------------------------------------------------------------

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील उपक्रम
एकीकडे अभियंत्यांना नोकरी नाही, तर दुसरीकडे नावाजलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना पदवी घेण्यापूर्वीच कंपन्यांकडून नोकरीची हमी मिळते. असे का घडते, हे समजण्यासाठी पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय काय करते, हे पाहूयात...

प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण घेत असताना इंटर्नशिप सक्तीची केली जाते. वर्षातून दोनदा विद्यार्थ्यांची कलचाचणी घेतली जाते.

कलचाचणीमध्ये त्या विद्यार्थ्याचे आवडते क्षेत्र कोणते, याची तपासणी करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना मुलाखतीचे कौशल्य, संवाद कौशल्य शिकवण्याचा प्रयत्न केला जातो. 

शैक्षणिक विभागांच्या अभ्यास मंडळामध्ये उद्योगांतील तज्ज्ञांना सहभागी करून घेतले जाते. उद्योगांची मागणी बदलली की त्यानुसार तत्काळ अभ्यासक्रमात बदल केले जातात.

प्लेसमेंट सेलतर्फे उद्योगांबरोबर समन्वयासाठी कक्ष सुरू केला आहे. त्याद्वारे उद्योगांना मनुष्यबळ पुरविण्याचा प्रयत्न केला जातो.

बदलते तंत्रज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी प्राध्यापकांकडून विशेष प्रयत्न केले जातात. महाविद्यालयात ३२ हून अधिक क्‍लब आहेत. याद्वारे विद्यार्थी विविध उपक्रम आयोजित करून समाजाबरोबर जोडण्याचा प्रयत्न केला जातो.     

(सीओईपीतील प्राध्यापक संदीप मेश्राम यांनी दिलेली माहिती.)

रोजगार मेळाव्यासंबंधी सकाळमध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त -

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com