#बेरोजगारी इंटर्नशिप सक्‍तीची हवी - डॉ. गजानन एकबोटे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जुलै 2018

विद्यार्थी हा पदवी वा पदव्युत्तर पदवीचा असो त्याला दरवर्षी शिकाऊ उमेदवारी (इंटर्नशिप) सक्‍तीची केली पाहिजे. 
प्राचार्य, शिक्षक यांना उद्योगांतील तज्ज्ञांकडून कौशल्य विकासासाठी प्रशिक्षित करण्याची गरज. 
प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांबरोबर त्यांचा नियमित संवाद घडवून आणला पाहिजे. अनेक अभ्यासक्रम कालबाह्य आहे, त्यांचा आढावा घेऊन त्यांची फेररचना आता काळाची गरज आहे.
(डॉ. एकबोटे हे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष आहे.) 

----------------------------------------------------------------------------------------
प्रयत्नांची कमतरता - डॉ. राजेंद्र जगदाळे
रोजगारनिर्मितीसाठी केवळ इंडस्ट्रीचा विचार करून चालणार नाही. शिक्षण आणि संशोधन व विकास क्षेत्रातही रोजगारनिर्मितीचा विचार व्हायला पाहिजे.
शिक्षण व्यवस्थेत उद्योगांचा सहभाग वाढवावा लागेल.
महाविद्यालये, शिक्षण संस्थांनी त्यासाठी उद्योगांकडे जावे. उद्योगांनी पुढे येत सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्व्हेन्शन अँड इन्क्‍युबेशनची उभारणी केली पाहिजे.
(डॉ. जगदाळे हे पुणे विद्यापीठातील सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी पार्कचे महासंचालक आहेत.)

----------------------------------------------------------------------------------------

शिक्षण व्यवस्थेचे चुकते कुठे?
अभ्यास मंडळावर उद्योगांतील तज्ज्ञांना अत्यल्प प्रतिनिधित्व दिले जाते.
व्यावसायिक अभ्यासक्रम ८०:२० पॅटर्नमध्ये कोंबून टाकले आहे. प्रात्यक्षिकांपेक्षा सैद्धांतिक (थिअरी) शिकविण्यावर अधिक भर.
प्रत्येक शैक्षणिक सत्रात अध्यापनाचे ९० तास भरलेच पाहिजे, या चाकोरीत शिक्षण बांधून टाकलले आहे. अध्यापनाचे तास ठरलेले आहेत. 
दरवर्षी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष उद्योगांमध्ये जाऊन अनुभव किती घ्यायचा, याचा प्रमाण अजूनही निश्‍चित नाही. 
उद्योगांबरोबर संपर्काची यंत्रणा बहुतांश शिक्षण संस्थाकडे नाही. 
विद्यार्थ्यांना शिकविण्याची पद्धती अजूनही ‘चॉक अँड टॉक’ पद्धतीची. उपयोजित पद्धतीचा अंतर्भाव त्यात केला जात नाही.
खासगी महाविद्यालयांची संख्या अधिक असल्याने अधिकाधिक विद्यार्थी उत्तीर्ण होण्यासाठी अंतर्गत परीक्षांमध्ये भरघोस गुण देण्याची प्रथा.
निकाल चांगले लागण्यासाठी प्रश्‍नपत्रिका सोप्या काढल्या जातात. त्याचे मूल्यमापनही गुणवत्तापूर्ण केले जात नाही.

रोजगार मेळाव्यासंबंधी सकाळमध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त -

#बेरोजगारी विद्यार्थ्यांमध्ये कौशल्याचा अभाव - भरत फाटक 
#बेरोजगारी शिक्षण पद्धतीत बदल हवा: प्रतापराव पवार
कुणी नोकरी देता का नोकरी?

Web Title: Educated Unemployed Issue Internships must be compulsory says Dr. gajanan Ekbote