शासकीय आदिवासी विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राची ओळख

दत्ता म्हसकर
सोमवार, 21 मे 2018

जुन्नर - 'मनोरंजनातून खगोलशास्त्र' शिकण्याचा एक आगळा-वेगळा प्रयोग पुण्यातील 'अॅस्ट्रॉन' या खगोलशास्त्रीय संस्थेने राजुरी ता.जुन्नर येथे कृषी पर्यटन केंद्रात केला. दर वर्षी संस्थेच्या वतीने असा उपक्रम राबविला जातो.

हा उपक्रम या वर्षी प्रामुख्याने आदिवासी आश्रम शाळेतील मुलांसाठी राबविण्यात आला. यात जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यांमधील शासकीय आश्रम शाळेतील वीस मुलां-मुलींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कला आणि विज्ञान विषयाची सांगड घालून अॅस्ट्रॉन- एस.एच.के.ट्रस्ट या संस्थेतर्फे 'अॅस्ट्रोटेन्मेन्ट' हा उपक्रम १९ व २० मे रोजी दोन दिवस पराशर कृषी पर्यटन केंद्र येथे आयोजित करण्यात आला.  

या वेळी मुलांसाठी खगोलशास्त्राशी संबंधित विविध उपक्रम घेतले गेले. आकाशातील राशी व नक्षत्रांची माहिती या कार्यक्रमाद्वारे मुलांनी घेतलीच परंतु दुर्बिणीमधून चंद्र, गुरु व त्याचे चंद्र तसेच शनी व त्याची कडी पाहताना मुलांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. मुलांनी उत्सुकता दाखवून दुर्बीण कशी काम करते याची माहिती विचारली ही माहिती घेत असताना पाठ्यपुस्तकातील "प्रकाश शास्त्र" या विषयाचा अजाणताच सखोल अभ्यास झाल्याचे मुलांनी सांगितले. अनिरुद्ध देशपांडे यांनी मुलांना ताऱ्यांचा जन्म व मृत्यू कसा होतो हे सांगितले तसेच आपली सूर्यमाला कशी अस्तित्वात आली याची सुद्धा माहिती दिली. 

प्रणव बारटक्के यांनी ताऱ्यांचे अंशात्मक अंतर मोजण्यासाठी अॅस्ट्रोलेब हे उपकरण बनवण्यास शिकवले. याच बरोबर मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी निमिष आगे यांनी विज्ञान कथा बनवणे यासारख्या उपक्रमांचे आयोजन केले होते. 

"आदिवासी जमातीतील मुलांनी नुकतेच एव्हरेस्ट शिखर पार केले. या पार्श्वभूमीवर आदिवासी मुलांना खगोलशास्त्राची माहिती मिळावी व या विषयात या मुलांनी पुढे येऊन कार्य करावे ही इच्छा असल्याने त्यासाठी 'अॅस्ट्रोटेन्मेन्ट', उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही पावले उचलली. या पुढील काळात  खगोलशास्त्राची माहिती विविध वयोगटातील तसेच विविध स्तरातील लोकांपर्यंत खगोलशास्त्र पोहचवण्याचे काम अॅस्ट्रॉन- एस.एच.के.ट्रस्ट या संस्थेतर्फे केले जाईल" असे अॅस्ट्रॉनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्वेता कुलकर्णी यांनी सांगितले.

Web Title: education of astronomy to government tribal students