पुन्हा वळली शिक्षणाकडे पावले!

Education
Education

पुणे - व्यवसायात काळानुरूप होणारे बदल आणि वाढती स्पर्धा लक्षात घेता १५ ते २० वर्षांपेक्षाही अधिक अनुभव असलेले नोकरदार, अधिकारी उच्च शिक्षणाला पसंती देत आहेत. कोणी आयुक्तपदावर, कोणी संरक्षण दलात कर्नल, तर कोणी खासगी कंपनीत व्यवस्थापक, संचालक अशा मोठ्या पदावर असतानाही पुन्हा एकदा शिक्षणाकडे वळत आहेत.

खासगी कंपनीत जवळपास पाच ते सहा वर्षांचा अनुभव असणारे केवळ कर्मचारीच नव्हे, तर संबंधित क्षेत्रात १५ ते २० वर्षांचा अनुभव नोकरदार, अधिकारी वर्ग पदव्युत्तर पदवी, पदविका आणि अल्प मुदतीचे व्यावसायिक प्रशिक्षणाकडे वळू लागले आहेत. व्यवस्थापन, संगणक, तंत्रज्ञान, विधी, बॅंकिंग, कौशल्य विकास यावर आधारित अभ्यासक्रमावर अधिक भर दिला जात आहे. 
पुणे विद्यापीठातील व्यवस्थापनशास्त्र विभागात (पुम्बा) २००८पासून एक्‍झिक्‍युटिव्ह एमबीए अभ्यासक्रम सुरू झाला. पुम्बातील ६० जागांसाठी दरवर्षी जवळपास सहाशेहून अधिक अर्ज येतात. प्रवेश परीक्षेतून विद्यार्थी निवडले जातात, असे ‘पुम्बा’च्या एक्‍झिक्‍युटिव्ह एमबीए अभ्यासक्रमाचे समन्वयक डॉ. मनीष वर्मा यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

उच्च शिक्षणासाठी मिळणाऱ्या सुविधा 
 जवळपास दोन वर्षांची मिळते ‘शिक्षण सुटी’
 शैक्षणिक शुल्कासाठी अतिरिक्त कार्यक्षमता भत्ता 
 कामाच्या वेळेत मिळते सवलत
 कंपनीच स्वीकारते शैक्षणिक शुल्काचे प्रायोजकत्व

भारतीय महसूल सेवेत वीसहून अधिक वर्षे कार्यरत आहे. आपल्या क्षेत्राशी संलग्न उच्च शिक्षणासाठी दोन वर्षांची शैक्षणिक सुटी घेतली आणि एमबीए अभ्यासक्रम पूर्ण केला. कर प्रणाली, सांख्यिकीशास्त्र, व्यवस्थापन, उद्योजकता विकास यावर अभ्यासक्रमात भर असल्याने त्याचा फायदा दैनंदिन कामकाजात होत आहे.
- संग्राम गायकवाड, आयुक्त, प्राप्तिकर विभाग, मुंबई 

आजचे युग हे ‘मल्टी टॅलेंटेड’चे असून, आपल्या क्षेत्रात बहुगुणी असणे ही काळाची गरज आहे. माझ्यातील उद्योजकतेला वाव मिळावा, म्हणून ‘एमबीए’ अभ्यासक्रम करत आहे. या अभ्यासक्रमासाठी कंपनीने अतिरिक्त कार्यक्षमता भत्ता देऊ केला आहे. 
- चैताली जगताप, ब्रॅंच मॅनेजर, पायोनिअर डिझाईन ॲण्ड इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड (एक्‍झिक्‍युटिव्ह एमबीए, द्वितीय वर्ष) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com