Educatin News : योमर्यादा नाही, तर संधी वाढवून द्या..

उमेदवारांची मागणी; सूट दिलेल्या कालमर्यादेत एकही सरळसेवा भरती नाही
MPSC Exam
MPSC Examsakal

पुण : कोरोनामुळे आमचे दोन वर्ष वाया गेले आहे. सरकारने वयोमर्यादा वाढविली, मात्र या काळात एकही सरळसेवा भरती प्रक्रिया पार पडली नाही. त्यामुळे वयोमर्यादे ऐवजी दोन वर्षांची संधी वाढवून द्यावी, अशी मागणी आता स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांनी केली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) अगदी दोनच दिवसांपूर्वी आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या भरतीची घोषणा केली आहे. एमपीएससीकडून आठ हजार १६९ पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यात लिपिक व टंकलेखक संवर्गासाठी तब्बल सात हजार ३३४ पदांची भरती करण्यात येणार आहे. या पदभरतीसाठी वयोमर्यादा १ मे २०२३ पर्यंतची गृहीत धरण्यात येणार असल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले आहे. मात्र, या वयोमर्यादेच्या अटीमुळे अनेकांची संधी नाकारली जात असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.

‘सकाळ’शी बोलताना श्वेता सांगते, ‘‘शासनाने १७ डिसेंबर २०२१च्या अध्यादेशानुसार जी सूट दिली आहे. तिची कालमर्यादा ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत होती. मात्र या कालमर्यादेत राज्यसेवा व संयुक्त परीक्षा वगळता इतर कोणत्याही पदभरतीच्या जाहिराती आल्या नाही. सरळसेवेची कोणतीच भरती या काळात झाली नाही. त्यामुळे वयोमर्यादे ऐवजी दोन वर्षाची संधी वाढवून द्यावी.’’ एमपीएससीच्या नव्या जाहिरातीमुळे अनेक उमेदवारांची आशा पल्लवीत झाली असून, निदान ही तरी भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडेल, असा उमेदवारांना विश्वास आहे.

उमेदवार म्हणतात..

- वयोमर्यादा वाढवून मिळाली, मात्र त्या कालमर्यादेत सरळसेवेची एकही भरती निघाली नाही

- दरवर्षी एमपीएससीची नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात जाहिरात येते, यंदा मात्र उशिरा आली आहे.

- २०१९ ते डिसेंबर २०२३ पर्यंत झालेल्या बहुतेक पदभरत्या एकतर रद्द झाल्या आहेत, किंवा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहे

- राज्य शासनाने ७५ हजारांची भरती घोषित केली असून, कोरोना सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे आमची संधी जायला नको

- केंद्र सरकारने तीन वर्षांची सवलत दिली आहे. राज्यानेही तसा विचार करावा

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यात ७५ हजार जागांची भरती करण्यात येणार आहे. सरकारने आम्हाला वयोमर्यादेची सूट दिली. मात्र, त्याकाळात एकही सरळसेवा भरती झाली नाही. म्हणजे आगीतून फुफाट्यात टाकल्यासारखी स्थिती आहे. आम्हाला वयोमर्यादेची नाही तर परीक्षा देण्याची संधी वाढवून द्यावी.

- राहुल कोळपे (नाव बदलले), स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com