पुणे : शिपायामार्फत शिक्षण उपसंचालक अशाप्रकारे स्वीकारायचे लाच; मग...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

  • भ्रष्टाचाराच्या रकमेतून अहिरे घेत इतरांच्या नावावर मालमत्ता

पुणे : भ्रष्टाचाराच्या रक्कमेतून इतर व्यक्तींच्या नावे मालमत्ता घ्यायची. त्यानंतर त्या मालमत्तेचा तत्कालीन शिक्षण उपसंचालक उपभोग घेत असल्याचे तपासातून पुढे आले आहे. न्यायालयात हजर केले असता त्यांची 15 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे विभागीय उपसंचालक कार्यालयातील तत्कालीन शिक्षण उपसंचालक प्रवीण अहिरे यांना शिपायामार्फत 26 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने सोमवारी अटक केली आहे. संबंधित शिपायास लाचलुचपत विभागाने यापूर्वीच अटक केली असून राजू पोपट खांदवे असे त्याचे नाव आहे. खांदवे यास दोन महिन्यांपूर्वीच अटक केली आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यास आला आहे. तक्रारदार यांचे अतिरिक्त विषय मंजुरीचे काम प्रलंबित होते. त्यास विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातून मंजुरी मिळवून देण्यासाठी खांदवे याने 50 हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती 26 हजार रुपयांची लाच स्वीकारताना खांदवे यास 6 डिसेंबर 2019 या दिवशी अटक करण्यात आली होती. दरम्यान, त्याने कोणासाठी लाच स्वीकारली, याची विभागाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू होती. त्यामध्ये अहिरे याने लाच स्वीकारण्यास प्रोत्साहन दिले, तसेच बनावट शासकीय कागदपत्रे बनविल्याचे निष्पन्न झाले.

Delhi Election : 'आय लव्ह यू' म्हणत विजयानंतर केजरीवालांनी दिली 'ही' प्रतिक्रीया

अहिरे यांच्याकडे असलेले चार चाकी वाहन सातारा येथील एका व्यक्तीच्या नावावर आहे. मात्र संबंधित वाहनाची देखभाल हे अहिरे करीत आहेत. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या रक्कमेतून इतर व्यक्तींच्या नावे मालमत्ता घ्यायची व त्याचा अहिरे उपभोग घेत असल्याचे तपासातून दिसून येते. अशा प्रकारे त्यांनी इतर कोणती मालमत्ता खरेदी केली आहे का? तसेच पुढील तपासासाठी त्यांना पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी केली होती. त्यानुसार विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी त्याची 15 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: education deputy director arrested in Bribe case pune