Budget Session 2023 : विकासनिधी मिळतो, पण शिक्षकांचे काय?

अर्थसंकल्पाबाबत शिक्षणतज्ज्ञांची भावना; डेक्कन, सीओईपीला भरीव निधी
Education expert over Budget Session 2023 Development funds teachers
Education expert over Budget Session 2023 Development funds teachers esakal

पुणे : राज्याच्या अर्थसंकल्पात शैक्षणिक विकासनिधीसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. पण शिक्षकांविना ओस पडत चाललेल्या संस्थांचे करायचे काय, हा मोठा प्रश्न आहे. सरकारने अर्थसंकल्पात आश्वासक पदभरती बद्दल निर्णय घ्यायला हवा, शेवटच्या घटका मोजत चाललेल्या शिक्षण संस्थात शिक्षकांची भरती तातडीने करावी, अशी कळकळीची भावना जवळपास सर्वच शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केली.

Education expert over Budget Session 2023 Development funds teachers
Budget Session 2023 : देशद्रोह्याला देशद्रोही म्हणणं चुकीचं असेल तर मी ५० वेळा ती चूक करेन - एकनाथ शिंदे

राज्याच्या अर्थसंकल्पाबद्दल शिक्षण तज्ज्ञांचे मत जाणून घेताना प्राध्यापकांच्या रिक्त पदांची तीव्रता लक्षात आली. एक तपाहून अधिक काळ रखडलेली शिक्षक भरती, ६० टक्क्यांहून अधिक रिक्त प्राध्यापकांची पदे आणि दिवसेंदिवस कमी होत चाललेले कायमस्वरूपीचे कर्मचारी यामुळे शैक्षणिक संस्थांचा जीव मेटाकुटीला आला आहे.

अर्थसंकल्पातील तरतूदींचे मात्र सर्वांनीच स्वागत केले. खासगी विनाअनुदानित संस्थेचे प्रतिनीधी रामदास झोळ सांगतात, ‘‘अर्थंसंकल्पात मुलींसाठी चांगल्या तरतूदी करण्यात आल्या आहेत. नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर निश्चितच स्वागतार्ह निर्णय आहे.

Education expert over Budget Session 2023 Development funds teachers
Budget Session 2023 : कांदा खरेदीच्या प्रश्नावरुन विरोधकांचा गोंधळ; उत्तर देताना मुख्यमंत्री संतापले!

फक्त शासनाने केलेल्या तरतूदी आणि अनुदानांच्या वितरणाचे काम प्रशासनाने योग्य पद्धतीने करावे एवढीच अपेक्षा.’’ तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर सांगतात, ‘‘राज्यातील काही विद्यापीठांना ५०० कोटींचे अनुदान घोषित करण्यात आले आहे. निश्चितच विकासकामांसाठी त्याचा फायदा होईल. मात्र नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर प्राध्यापकांची रिक्त पदे भरणे गरजेचे असून, त्यासाठी आश्वासक पाऊल उचलायला हवे.’’

डेक्कन आणि सीओईपीला विशेष अनुदान...

राज्याच्या अर्थसंकल्पात डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्था आणि सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठासह नऊ शैक्षणिक संस्थांना ५०० कोटींचे अनुदान घोषित करण्यात आले आहे. तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागासाठी २०२३-२४ वर्षाकरिता एक हजार ९२० कोटी रूपयांचा खर्च प्रस्तावित आहे.

Education expert over Budget Session 2023 Development funds teachers
Budget Session 2023 : ज्येष्ठ नागरीकांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात काहीसा दिलासा

यंदाच्या अर्थसंकल्पात शिक्षणाबरोबरच कौशल्यविकासावरही भर देण्यात आला आहे. त्यामुळे हे अत्यंत समाधानकारक पाऊल असून, उद्योजगता आणि कौशल्यविकासाला चांगला निधी मिळाला आहे. शिक्षणाबरोबरच कौशल्याची जोड ही काळाची गरज झाली आहे.

- प्रा. अपूर्वा पालकर, कुलगुरू, राज्य कौशल्य विद्यापीठ

विद्यापीठांच्या यादीमध्ये सीओईपीला गृहीत धरत अनुदान मिळणे हे निश्चितच स्वागतार्ह बाबा आहे. हे विशेष अनुदान असून, सीओईपीत कौशल्य विकासासंबंधी चाललेल्या विविध उपक्रमांसाठी याचा निश्चितच फायदा होणार आहे.

- प्रा. मुकुल सुतावणे, कुलगुरू, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ, पुणे

नवीन शैक्षणिक धोरण उंबरठ्यावर असताना प्रोत्साहन देणारा हा अर्थसंकल्प आमच्या संस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या विकास निधीच्या माध्यमातून १८६४ मध्ये बांधलेल्या आमच्या हेरीटेज बिल्डींगचे नुतनीकरण, पुरातत्व विषयांच्या प्रयोगशाळांचे आधुनिकीकरण, संग्राहलाय आणि संस्कृत शब्दकोषाच्या प्रकल्पाला यामुळे बळ मिळेल. तसेच भाषषाशास्राची प्रयोगशाळा अद्ययावत करण्यासाठी या निधीचा सदउपयोग होईल.

- डॉ. प्रसाद जोशी, प्र-कुलगुरू, डेक्कन कॉलेज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com