"केवळ त्रास देण्यासाठी शिक्षणमंत्र्यांना एसएमएस' 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

पुणे - "शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सोलापूर येथील तंत्रनिकेतन बंद करू नये,' असे एसएमएस पाठविणाऱ्या विद्यार्थ्यांना दूरध्वनीवरून धमकावल्याचे वृत्त एका वाहिनीने दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्याचा निषेध केला आहे. दरम्यान, कोणतेही तंत्रनिकेतन बंद करणार नाही. केवळ शिक्षणमंत्र्यांना त्रास देण्यासाठी त्यांना "एसएफआय' संघटनेने एसएमएस पाठविले, असा खुलासा तावडे यांच्या कार्यालयाने केला आहे. 

तावडे यांनी विद्यार्थ्यांना धमकावल्याच्या बातमीची एक "व्हिडिओ क्‍लिप' सोशल मीडियावर "व्हायरल' झाली आहे. त्यामध्ये "विद्यार्थ्यांनी एसएमएस पाठविणे बंद केले नाही, तर तंत्रनिकेतन बंद करू, पोलिसांत तक्रार देऊ, मला सॉरीचा एसएमएस पाठवा,' असे तावडे यांनी म्हटले आहे. पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी त्याचा निषेध केला आहे. तावडे यांनी राजीनामा द्यावी, अशी मागणी करणारी पत्रके विद्यापीठातील भिंतीवर चिकटविण्यात आली आहेत. 

तावडे यांच्या माध्यम समन्वयकांनी या प्रकरणाचा खुलासा माध्यमांकडे केला आहे. त्यात म्हटले आहे, की कुठलेही शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज बंद करणार नाही, असे तावडे यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात स्पष्टपणे सांगितले होते; पण स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) या कम्युनिस्ट पक्षप्रणित विद्यार्थी संघटनेने केवळ भाजपद्वेषापोटी विद्यार्थ्यांना भडकविण्यास सुरवात केली आहे. तावडे यांना वारंवार एसएमएस पाठविले होते. 

मोबाईलवर आठशे एसएमएस 
विद्यार्थ्यांनी मोबाईलवर सुमारे आठशे एसएमएस पाठविले. यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात यावी, असे पोलिसांनी सांगितले होते. पण विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन तक्रार दाखल केली नाही. गेल्या काही वर्षांत शिक्षणामध्ये सोळाव्या क्रमाकांवर असलेल्या महाराष्ट्राने तिसऱ्या क्रमाकांवर झेप घेत राज्यातील शिक्षणाचा आलेख उंचविला आहे, असा दावा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला आहे. 

Web Title: Education ministers SMS to only trouble