आवडीनुसार शिक्षण हवे - तावडे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

पुणे - ‘‘पदवी शिक्षणाप्रमाणेच तरुणांमधील कौशल्याला महत्त्व दिले गेले पाहिजे. आवडीनुसार उच्च शिक्षण घेण्याची पद्धत विद्यार्थ्यांत नव्याने रुजत आहे. आगामी काळात याच पद्धतीच्या आधारे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जाईल,’’ असे मत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले. शिक्षणाबरोबरच ‘श्रम आणि निष्ठा’ याचे उदाहरणासह महत्त्व सांगत तावडे यांनी विद्यार्थ्यांचा तास घेतला.

सिंबायोसिस कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या तिसरा पदवीप्रदान सोहळा तावडे यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, सिंबायोसिस शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. सोमण, उपप्राचार्य डॉ. सुनयनी परचुरे, महाविद्यालयीन परीक्षा अधिकारी डॉ. मार्सेल सॅम्युअल आदी मान्यवर उपस्थित होते.

‘‘विद्यार्थ्यांना आवडीनुसार मुक्तपणे शिक्षण निवडता यावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यासक्रम असणाऱ्या जवळपास ३० शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. आगामी काळात ही संख्या शंभरपर्यंत नेण्याचा सरकारचा मानस आहे,’’ असे तावडे यांनी सांगितले. 
‘‘विज्ञान आणि अध्यात्म, कला, तंत्रज्ञान याची सांगड शिक्षणातून घातली गेली पाहिजे,’’ असा सल्ला डॉ. मुजुमदार यांनी दिला. या कार्यक्रमात चारशेहून अधिक विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

शिक्षणमंत्र्यांनी दिलेला सल्ला 
 शिक्षणाचा सामान्यांना काय उपयोग होईल, याकडे लक्ष द्यावे
 ‘सिंबायोसिस’सारख्या शिक्षण संस्थांनी ग्रामीण भागातील महाविद्यालये दत्तक घ्यावी
 शिक्षणाबाबतची मानसिकता बदलण्याची गरज

Web Title: education vinod tawde