एमआयटी स्कूल आणि आयएमटीएमए यांच्यात शैक्षणिक सामंजस्य करार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलाजी विद्यापीठाच्या एमआयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग आणि इंडियन मशिन टूल्स अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयएमटीएमए) यांच्यासोबत नुकताच शैक्षणिक सामंजस्य करार झाला.

लोणी काळभोर - देशाच्या औद्यागिक क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस पायभूत सुविधा व गुंतवणुकीचे प्रमाण वाढत आहे. या क्षेत्रासाठी आवश्यक असणारी गुवणत्ताधारक विद्यार्थ्यांची गरज भरून काढणे गरजेचे आहे, असे मत इंडियन मशिन टूल्स अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या बंगलोर विभागाचे वरिष्ठ संचालक एम. कृष्णमूर्ती यांनी व्यक्त केले.

एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलाजी विद्यापीठाच्या एमआयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग आणि इंडियन मशिन टूल्स अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयएमटीएमए) यांच्यासोबत नुकताच शैक्षणिक सामंजस्य करार झाला. यावेळी बोलताना एम. कृष्णमूर्ती यांनी वरील मत मांडले. यावेळी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. मंगेश कराड, 'आयएमटीएमए'चे विभागीय सहाय्यक संचालक प्रसाद पेंडसे, आयएमटीएमएचे पुणे प्रमुख अविनाश खरे, विद्यापीठातील मॅकेनिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सुदर्शन सानप आणि प्रा. सुरज भोयर उपस्थित होते.

यावेळी डॉ. मंगेश कराड म्हणाले, 'एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या माध्यमातून औद्योगिक क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्याकडे आमचा कल आहे. विद्यापीठातील आभियांत्रिकी शाखेच्या विविध अभ्यासक्रमातून गुवणत्ताधारक विद्यार्थी घडविण्याचे काम याठिकाणी होते. आयएमटीएमए आणि एमआयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंगमध्ये झालेल्या या सामंजस्य करारामुळे औद्योगिक क्षेत्राला मोठ्या प्रमाणात फायदा होईल.'

Web Title: Educational Coordination Agreement between MIT School and IMTMA