वनमित्र अभियानाची परिणामकारक अंमलबजावणी करा : गटविकास अधिकारी सतीश गाढवे 

दत्ता म्हसकर
बुधवार, 13 जून 2018

जुन्नर -  आदिवासी विकास विभागाच्या वनमित्र अभियानाची जुन्नर तालुक्यात परिणामकारक अंमलबजावणी करा असे आवाहन गटविकास अधिकारी सतीश गाढवे यांनी येथे केले. जुन्नर तालुका पंचायत समितीच्या राजमाता जिजाऊ सभागृहात सोमवारी ता.11 रोजी ग्रामसेवक व सरपंच यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती यावेळी ते बोलत होते.

गाढवे म्हणाले, वनहक्क बाबतचे तालुक्यातील वैयक्तिक व सामूहिक दावे येत्या सहा महिन्यात निकाली काढणे अपेक्षित आहे. यासाठी अनुसूचित जमाती व पारंपारिक वननिवासी (वनहक्काची मान्यता ) अधिनियम 2006 चे नियम 2008 आणि सुधारित नियम 2012 ची काटेकोर अंमलबजावणी करावी. प्रलंबित वनहक्क दावे व अपीले यांचा कालबद्ध निपटारा करावा. यावेळी तहसीलदार किरण काकडे, उपसभापती उदय भोपे, सदस्य जीवन शिंदे, एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय घोडेगावचे योगेंद्र खंदारे व के.बी.मोरे, डॉ.एस.बी.जाधव, डॉ.उमेश गोडे, प्रकल्प अधिकारी रवींद्र तळपे, ए.एल.वसईकर, जिल्हा पेसा समन्वयक  विनोद इंगोले आदी मान्यवर उपस्थित होते. 

सुत्रसंचालन व आभार तालुका पेसा समन्वयक मधुकर ठोगीरे यांनी केले.

Web Title: Effective implementation of the Vanamitra Mission