कार्यक्षम प्रशासनाचा "संकल्प' विज्ञाननिष्ठच - डॉ. विजय भटकर

कार्यक्षम प्रशासनाचा "संकल्प' विज्ञाननिष्ठच - डॉ. विजय भटकर

पुणे - ""प्रशासकीय सेवेत जाण्याआधी स्वच्छ आणि कार्यक्षम अधिकारी बनण्याचा "चाणक्‍य मंडल परिवारा'ने तयार केलेला "संकल्प' विज्ञाननिष्ठ आहे,'' असे मत संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केले. 

एमपीएससी परीक्षेत यश मिळविलेल्यांचे अभिनंदन करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भटकर बोलत होते. यंदा परीक्षेत निवडलेल्या 129 पैकी 40 हून जास्त विद्यार्थी चाणक्‍य मंडलचे आहेत. राज्यात प्रथम आलेला आशिष बारकुल, दुसरा महेश जमदाडे आणि चौथा पोपट ओमासे हेदेखील चाणक्‍य मंडलचेच विद्यार्थी आहेत. इतिहासात आपल्या देशावर हजारो आक्रमणे झाली असली, तरी एकविसाव्या शतकात भारत देश अमेरिका आणि चीनला मागे टाकेल, असा विश्‍वास डॉ. भटकर यांनी व्यक्त केला. 

ग्रामीण भागातील परिस्थिती मुलांना प्रशासनात येण्याची प्रेरणा देते, ही बाब चांगली असून, ही प्रेरणा भविष्यात अधिकाऱ्यांना अधिक कार्यक्षम बनवेल, असा विश्‍वास उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झालेल्या दयानंद जगताप याने व्यक्त केला. या कार्यक्रमात चाणक्‍य मंडल परिवार आणि टाटा मॅकग्रॉ हिल यांनी तयार केलेल्या यूपीएससी पूर्वपरीक्षेचे अवलोकन करणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी माजी आयएएस अधिकारी श्‍याम देशपांडे आणि चाणक्‍य मंडलचे विश्‍वस्त भूषण केळकर उपस्थित होते. 

कोर्स नीट करण्याची सक्ती 
स्पर्धा परीक्षांमधील महाराष्ट्राचा टक्का कमी होत असल्याची चुकीची समज पसरवली जात असल्याबद्दल अविनाश धर्माधिकारी यांनी चिंता व्यक्त केली. चाणक्‍य मंडलमध्ये शुल्काची सक्ती नसून कोर्स नीट करण्याची आणि प्रशासनात जाऊन स्वच्छ आणि कार्यक्षम अधिकारी बनण्याची सक्ती असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com