आयसरमध्ये विद्यार्थ्यांची विज्ञानाशी गट्टी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘सकाळ एनआयई’ने आयोजित केलेल्या उन्हाळी सुटी कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांनी नुकतीच पाषाण येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च’ला (आयसर) भेट देऊन आयसरमधील करिअर, वैज्ञानिकांची विचारपद्धती, पक्ष्यांची जीवनशैली व त्यांचे आवाज, तसेच टाकाऊ वस्तूंपासून वैज्ञानिक खेळण्यांबाबत माहिती घेतली. 

पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘सकाळ एनआयई’ने आयोजित केलेल्या उन्हाळी सुटी कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांनी नुकतीच पाषाण येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च’ला (आयसर) भेट देऊन आयसरमधील करिअर, वैज्ञानिकांची विचारपद्धती, पक्ष्यांची जीवनशैली व त्यांचे आवाज, तसेच टाकाऊ वस्तूंपासून वैज्ञानिक खेळण्यांबाबत माहिती घेतली. 

सेंटर ऑफ एक्‍सलन्स, सायन्स अँड मॅथेमॅटिक्‍स इंद्राणी बालन सेंटर येथे अशोक रूपनेर यांनी विद्यार्थ्यांना हवेचा दाब, गती, प्रकाशाचा वेग, स्ट्रॉच्या माध्यमातून निर्माण होणारे ध्वनी, ध्वनितरंग यांची माहिती दिली. चैतन्य मुंगी यांनी आयसरमधील करिअरबद्दल मार्गदर्शन केले, तर डॉ. अपर्णा देशपांडे यांनी इलेक्‍ट्रॉनिक मायक्रोस्कोपची माहिती दिली. डॉ. अपूर्वा बर्वे, नेहा आपटे, सीमा रूपनेर, सुजाता पाटोळे, विठ्ठल शेजवळ, अक्षया केळसकर, सुमीत जाधव यांनी संयोजन केले.

निसर्गाबद्दल कुतूहल जागविणे हाच विज्ञानाचा हेतू आहे. मुलांना जास्तीत जास्त प्रश्‍न विचारू द्या. वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्या पाल्यांमध्ये रुजविणे हा पालकांचा मुख्य उद्देश असला पाहिजे. तरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल. 
- डॉ. निशिकांत सुभेदार, प्राध्यापक, आयसर, पुणे

विद्यार्थ्यांच्या कौशल्याला वाव द्या. त्यांना प्रोत्साहित केल्यास त्यांच्यातील कौशल्ये विकसित होतील. त्यांना वैज्ञानिक प्रश्‍न पडले पाहिजेत. त्यांच्यातील संशोधनाला वाव दिला पाहिजे.
- अनिर्बन हाजरा, प्राध्यापक, आयसर, पुणे

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पक्षिजगताची माहिती घेणे अधिक सोपे झाले आहे. निसर्गाचा समतोल राखण्यात पक्ष्यांची महत्त्वाची भूमिका आहे. पक्ष्यांसारखे अनुकूलन मानवानेही स्वीकारले पाहिजे. मनुष्य व पक्षी यांची जीवनशैली भिन्न आहे त्यामुळे त्यांचे रक्षण केले पाहिजे.
- आनंद क्रिष्णन्‌, पक्षिमित्र व मार्गदर्शक

सभासद नोंदणी सुरू
‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘सकाळ एनआयई’ (न्यूजपेपर इन एज्युकेशन) या विद्यार्थिप्रिय उपक्रमाची २०१८-१९ या शैक्षणिक वर्षाकरिता सभासद नोंदणी सुरू झाली आहे. या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी नजीकच्या ‘सकाळ’ कार्यालयात अथवा विशाल सराफ (९९२२९१३४७३) यांच्याशी संपर्क साधावा.

Web Title: eicher school pashan student science