Raksha Bandhan 2019 : ईद आणि रक्षाबंधनाचा अनोखा मिलाफ!

रमेश मोरे
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

रक्षाबंधन 2019 : पुणे : पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी येथे हिंदु मुस्लिम एकात्मता वाढीस लागावी, सामाजिक सलोखा जपला जावा याकरीता हिंदु मुस्लिम बांधवांनी एकत्रित येवून ईद आणि रक्षाबंधन सण साजरा केला. त्यांनी यावेळी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

येथील रोहित राज प्रतिष्ठान यांच्यावतीने  घेण्यात आलेल्या या उपक्रमात मुस्लिम बांधवाना राखी बांधून ईद आणि रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. तर पुरपरिस्थिती नंतर परिसरात पसरलेली अस्वच्छता, याकामी आरोग्य विभागातील सफाई कामगारांनी घेतलेली दक्षता याबद्दल महीला सफाई कामगारांचा साडी चोळी देवून सन्मान करण्यात आला.

यावेळी रमा बाराथे, संजय गांधी निराधार समिती सदस्य अदिती निकम, राधाबाई शिंदे, शारीक शेख, अजम शेख, योगेश थोरात,प्रितम लगड आदी उपस्थित होते.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eid and Rakshabandhan celibrated together at Dapodi