#EID भोर पोलिसांकडून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा
भोर(पुणे) - पोलिस ठाण्याच्या वतीने शहरातील मुस्लिम बांधवाना रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. येथील मुस्लिम दफनभूमी परिसरात पोलिस निरीक्षक पांडुरंग सुतार यांच्या मुस्लिम बांधवांना गुलाबपुष्प देण्यात आले. याशिवाय पोलिसांनी मुस्लिम बांधवांना रमजानचे उपवास सोडण्यासाठी भोर शहरातील चारही मज्जीदींमध्ये ड्रायफ्रूटचे व खाद्यपदार्थांचे मोफत वाटपही केले.

शनिवारी (ता.१६) सकाळी दफनभूमीजवळ झालेल्या कार्यक्रमात पोलिस उपनिरीक्षक नंदकुमार सुतार, हवालदार प्रदीप नांदे, विश्वनाथ जाधव, शिवाजी काटे, भाजपाचे सतीश शेटे, विजयकुमार वाकडे, कपिल दुसंगे, कॉग्रेसचे माजी नगरसेवक जगदीश किरवे यांनीही मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. भोर शहरातील हिंदू-मुस्लिम जनतेमधील एकी अशीच कायम राहावी अशी ईच्छा पोलिस निरीक्षक पांडुरंग सुतार यांनी व्यक्त केली.
पोलिसांनी केलेल्या उपक्रमाबद्दल मुस्लिम जमातीचे कासमभाई आत्तार, नगरसेवक निसार नालबंद, जमीर आत्तार, बशीर शेख, आस्लम आतार आदींनी आनंद व्यक्त करुन त्यांचे आभार मानले.